Mallikarjun Kharge on Mahakumbh : आरएसएस आणि भाजप देशद्रोही. गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल, तर संविधानाचे रक्षण करा.
Mallikarjun Kharge on Mahakumbh : महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी देश-विदेशातून करोडो भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत. यामध्ये अनेक भाजप नेत्यांचीही नावे सामील आहेत. पण, आता यावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खोचक टोला लगावला आहे. भाजप नेत्यांमध्ये गंगेत डुबकी मारण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. पण गंगेत डुबकी मारून गरिबी दूर होणार नाही, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. एवढंच नाही तर, आरएसएस आणि भाजप देशद्रोही आहेत. जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल, तर संविधानाचे रक्षण करा, असेही खर्गे यांनी म्हटले आहे. ते महू येथे बोलत होते.
खर्गे पुढे म्हणाले, मोदी आणि शहा यांनी मिळून एवढे पाप केले आहे की, ते सात जन्मही स्वर्गात जाणार नाहीत. भाजपचे लोक मशिदीखाली मंदिर शोधत आहेत, शिवलिंग शोधत आहेत. एकीकडे भागवत म्हणत आहेत की, असे करू नका आणि दुसरीकडे ते असेच करत आहेत. आज भाजप-आरएसएसचे लोक काँग्रेसबद्दल वाईट बोलत आहेत. पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही केले नाही. हे लोक स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांसोबत होते. ते ब्रिटिशांची नोकरी करत होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे काहीही योगदान नाही. यामुळे, तुम्हाला एकत्र येऊन या लोकांना धडा शिकवावा लागेल आणि तुमच्या हक्कांचे रक्षण करावे लागेल. (Mallikarjun Kharge on Mahakumbh)
गंगा स्नानासंदर्भात बोलताना खर्गे म्हणाले, गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होते का? तुम्हाला जेवण मिळते का? मला कुणाचीही भावना दुखवायची नाही. जर कुणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागतो. पण तुम्ही मला सांगा, जेव्हा मूल उपासमारीने मरत आहे, मूल शाळेत जात नाही, मजुराला मजुरी मिळत नाही, असे असताना, या लोकांची हजारो रुपये खर्च करून डुबकी मारायची स्पर्धा सुरू झाली आहे. टीव्हीवर काहीतरी चांगले येईपर्यंत डुबकी मारत राहतात. अशा लोकांपासून देशाला काहीही फायदा होऊ शकत नाही.

भाजपचे प्रत्युत्तर
खर्गे यांच्या विधानावर भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले, खर्गे इतर कुण्या धर्माबद्दल असे बोलू शकतात का? सनातन धर्माविरुद्ध असे शब्द आणि विधान निषेधार्ह आहे. काँग्रेस पक्षाने यावर स्पष्टीकरण द्यायला हवे. आपण सत्तेत आलो तर सनातन संपून टाकू, असे म्हणणारे हे तेच खर्गे आहेत. भाजप नेते अमित मालवीय यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या या टिप्पणीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. त्यात भाजप नेत्याने काँग्रेस अध्यक्षांवर हल्लाबोल केला. (Mallikarjun Kharge on Mahakumbh)
यासोबतच भाजप नेते अमित मालवीय म्हणाले, काँग्रेस हिंदूंचा इतका द्वेष का करते? महाकुंभ 144 वर्षातून एकदा येतो, पण काँग्रेस नेते इतके नाराज आहेत की, ते हिंदूंना शिव्या देत आहेत. आधी काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनी कुंभला वाईट म्हटले आणि आता खुद्द काँग्रेस अध्यक्षांनीच आघाडी उघडली आहे. काँग्रेस आता नवी मुस्लिम लीग झाली आहे. हा पक्ष देशासाठी एक अरिष्ट बनला आहे. त्याचे विलोपन सर्वांच्या हिताचे आहे.

अमित शहा यांनी आजच कुंभात स्नान केले
प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिवेणी संगममध्ये स्नान केल्यानंतर काही तासांनी काँग्रेस प्रमुखांची ही टिप्पणी आली आहे. दुपारी एकच्या सुमारास अमित शहा यांच्यासह काही श्रेष्ठ संतांनी स्नान केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही डुबकी घेतली. गृहमंत्र्यांनी जुनापिठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज आणि इतर काही श्रेष्ठ संतांशीही संवाद साधला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. (Mallikarjun Kharge on Mahakumbh)
अर्थसंकल्प 2025 मध्ये काय स्वस्त आणि महागणार? सामान्यांना दिलासा मिळणार?
