Satya Nadella Met PM Modi : नवी दिल्लीत सत्या नडेला यांनी पीएम नरेंद्र मोदींची भेट घेतली.
Satya Nadella Met PM Modi : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ, भारतीय वंशाचे सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मायक्रोसॉफ्ट भारतात 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही केली. तसेच 1 कोटी तरुणांना Ai साठी प्रशिक्षित करणार असल्याचेही सांगितले. बजेटपूर्वीच मोठ्या गुंतवणुकीची घोषणा झाल्याने बाजारात आनंदाची उसळी येण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची भेट घेतली. भारतातील गुंतवणुकीसह अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
यावेळी त्यांनी कंपनीच्या विस्तार आणि गुंतवणुकीबाबत माहिती दिली. यामध्ये एआय, क्लाऊड सर्व्हिसपासून ते विविध अविष्काराचा समावेश आहे. सोमवारी ही भेट झाली. याची माहिती नडेला यांनी एक्सवर दिली आहे. Satya Nadella Met PM Modi
नडेला यांनी आज याची माहिती देत भारतात मायक्रोसॉफ्ट 3 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूक करणार असल्याचीही घोषणा केली. मायक्रोसॉफ्ट 2030 पर्यंत भारतातील सुमारे 1 कोटी लोकांना AI कौशल्य विकास प्रशिक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.