QR Code Scam

QR Code Scam : पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने स्वत:चा QR कोड लावून 58 लाख लुटले, गुन्हा दाखल

QR Code Scam : कर्नाटकातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

QR Code Scam : कर्नाटकातील मंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बंगाराकुलूर येथील पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याने पेट्रोल पंपाऐवजी स्वतःच्या क्यूआर (QR) कोडचा वापर करून 58 लाख रुपयांची फसवणूक केली. हा कर्मचारी 2 वर्षांपासून क्यूआर कोडद्वारे आपल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करत होता. याबाबत माहिती उघडकीस येताच पेट्रोल पंप व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव मोहनदास असून, आरोपी पंप कर्मचारी मंगळूरमधील बंगाराकुलूर जवळील रिलायन्स पेट्रोल पंपावर पर्यवेक्षक होता. तो जवळपास 15 वर्षांपासून पेट्रोल पंपावर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने 2 वर्षात 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपीने ग्राहकांच्या पेमेंटसाठी पंप मालकाकडून लावण्यात आलेला क्यूआर कोड काढून स्वतःच्या बँक खात्याचा क्यूआर कोड लावला होता. QR code Scam

ग्राहकाने दिलेले पैसे आरोपी कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित होत होते. आरोपीने 10 मार्च 2020 रोजी आपल्या बँक खात्याचा क्यूआर कोड पंपावर लावला होता. याबाबत माहिती उघडकीस येताच त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पेट्रोल पंप कंपनीचे व्यवस्थापक संतोष मॅथ्यू यांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मंगळुरू येथील सायबर क्राइम अँड इकॉनॉमिक स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोहनदासला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत.

‘EVM म्हणजे Every Vote against Mulla’, महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य


QR code Scam

More From Author

Rupee vs Dollar

Rupee vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण! भारतीय चलन विक्रमी नीचांकावर

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : मी निवडणुकीतून माघार घ्यायला तयार, अमित शहांनी…केजरीवालांचे आव्हान

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत