PM Modi Podcast: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखिल कामथ यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत भाग घेतला.
PM Modi Podcast: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी जगातील युद्ध परिस्थिती, राजकारणातील तरुणांचा प्रवेश, पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधील फरक यावर मुलाखतीमध्ये भाष्य केले. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी चुका होतात, मीही त्या केल्या असत्या कारण मी सुद्धा एक माणूस आहे, देव नाही, असे म्हटले.
निखिल कामथ यांच्या ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ या पॉडकास्ट शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी माझ्यासाठी पॉडकास्ट पहिल्यांदाच घडत आहे, मला माहित नाही की ते तुमच्या प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचेल. मुलाखतीमध्ये निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना अनेक रोचक प्रश्न विचारले. पंतप्रधान मोदींनीही या प्रश्नांना अतिशय धीटपणे उत्तरे दिली. पहिल्या टर्ममध्ये मी दिल्लीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि लोक मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या टर्ममध्ये हे सगळं अधिक चांगले समजू लागले, असं पंतप्रधान मोगी म्हणाले. PM Modi Podcast
जगातील वाढत्या युद्धांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की आम्ही तटस्थ नाही आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असं पंतप्रधान म्हणाले. राजकारणातील तरुणांच्या भूमिकेवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांनी महत्त्वाकांक्षेने नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे, असं म्हटलं. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. “चुका होतात, माझ्याकडूनही त्या झाल्या असतील. मी सुद्धा एक माणूस आहे, देव नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
उत्तराखंडमध्ये याच महिन्यात UCC लागू होणार, सीएम पुष्कर सिंह धामींची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझे शिक्षक होते ज्यांचं नाव रासबिहारी मणियार असे होते. ते जेव्हाही मला पत्र पाठवायचे त्यात नेहमी तू असे संबोधायचे. परंतु अलीकडेच वयाच्या 94व्या वर्षी त्यांचे निधन झाले. रासबिहारी मणियार एकमेव व्यक्ती होते जे मला तू म्हणून बोलवायचे. मी खूप कमी वयात घर सोडले होते त्यामुळे माझा शाळेतील मित्रांशी संपर्क नव्हता. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा शाळेतील मित्रांना बोलवले परंतु त्यांच्याशी बोलताना मैत्री दिसली नाही कारण त्यांच्या नजरेत मी मुख्यमंत्री होतो मात्र मी त्यांच्यात मित्र शोधत होतो असे त्यांनी म्हटले. PM Modi Podcast
तसेच माझं आयुष्य थोडं विचित्र आहे. मी लहान वयात घर सोडले होते. सर्वकाही सोडले कुणाशी संपर्क नव्हता. माझे जीवन एका भटकत्या व्यक्तीसारखे होते, मला कोण विचारणार..पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या मनात काही इच्छा निर्माण झाल्या. त्यात माझ्या वर्गातील जितके जुने मित्र होते त्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी बोलवू. यामागे माझी मानसिकता अशी होती. माझ्यासोबतच्या कुठल्याही व्यक्तीला असे वाटू नये की मी खूप मोठा माणूस झालोय, मी तोच होतो जो गाव सोडून आलो होतो. माझ्यात बदल झाला नाही ते क्षण मला जगायचे होते असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
PM Modi Podcast