Narendra Modi Omar Abdullah : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, विकसित भारतासाठी उत्तम संसाधने आवश्यक आहेत.
Narendra Modi Omar Abdullah : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमधील झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लादेखील तिथे उपस्थित होते. याशिवाय, राज्याचे नायज राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात शांततापूर्ण निवडणुका पार पाडल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, तुम्ही (पीएम मोदी) काही महिन्यांपूर्वी राज्यातील जनतेला 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही म्हणाला होता की, तुम्ही हृदय आणि दिल्लीतील अंतर कमी करण्याचे काम करत आहात आणि हे तुमच्या कामातून सिद्ध झाले आहे. लवकरच निवडणुका होतील आणि लोकांना त्यांच्या मतांद्वारे सरकार निवडण्याची संधी मिळेल, असे तुम्ही आश्वासन दिले होते. तुम्ही तुमचे शब्द खरे ठरवले आणि 4 महिन्यांत निवडणुका झाल्या.
कुठल्याही गडबडीशिवाय राज्यात शांततेत निवडणुका पार पडल्या, याचे श्रेय तुम्हाला, तुमच्या सहकाऱ्यांना आणि भारताच्या निवडणूक आयोगाला जाते. तुम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासनही दिले होते. जेव्हा लोक मला याबद्दल विचारतात, तेव्हा मी त्यांना सांगतो की, पंतप्रधान मोदींनी निवडणुका घेण्याचे आश्वासन पूर्ण केले. मला विश्वास आहे की, लवकरच हे वचनही पूर्ण होईल आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा बहाल होईल, असा विश्वास अब्दुल्ला यांनी यावेळी व्यक्त केला.
अमेरिकेतील सर्वात वाईट दुर्घटना; 11 लाख कोटींचे नुकसान, 40 हजार एकर परिसराची राख
Narendra Modi Omar Abdullah