Delhi School Bomb

Delhi School Bomb Threat: दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; दहशतवादी कनेक्शन?

Delhi School Bomb Threat: लॅपटॉप आणि मोबाईलवरही जप्त करण्यात आला आहे.

Delhi School Bomb Threat: दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईलवरही जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाचे कुटुंब एका एनजीओच्या संपर्कात होते. या एनजीओचे दहशतवादी अफझल गुरुशी संबंध उघड झाले आहेत.

मुलाचे वडील दहशतवादी अफजल गुरुच्या फाशीविरोधात आवाज उठवणाऱ्या एनजीओशी संबंधित आहेत. पोलिस म्हणाले, शाळांमध्ये अनेक दिवसांपासून बॉम्ब ठेवल्याचे बनावट मेल येत होते. गेल्या वर्षी 12 फेब्रुवारीपासून अशाप्रकारचे अनेक कॉल आणि मेल्सला सुरुवात झाली. हे मेल अतिशय प्रगत पद्धतीने पाठवले जात होते, त्यामुळे आरोपींना शोधण्यात पोलिसांना वेळ लागला.

https://boltevha.com/maharashtra-mr/nnylon-manza-accident-14/

दिल्लीतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुलाच्या कृत्यामागे कोणाचा हात आहे? याचा आम्ही तपास करत आहोत. मुलाचे वडील ज्या एनजीओशी संबंधित आहेत, त्या एनजीओने दहशतवादी अफझल गुरुला फाशीला देण्याच्या विरोधातही आवाज उठवला होता. दरम्यान, आता पोलीस वेगवेगळ्या अँगलनेही तपास करत आहेत.
Delhi School Bomb Threat

 जम्मू-काश्मीरच्या नौशेरात बॉम्ब ब्लास्ट, 6 जवान जखमी

More From Author

Jammu Kashmir Blast

Jammu Kashmir Blast : जम्मू-काश्मीरच्या नौशेरात बॉम्ब ब्लास्ट, 6 जवान जखमी

Mahakumbh 2025

Mahakumbh 2025 : पहिल्या अमृत स्नानात जनसागर; 3.50 कोटी साधू-संत, भाविकांनी केले पवित्र स्नान…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत