Bharatpol in India

Bharatpol in India : लवकरच भारतात स्थापन होणार ‘भारतपोल’, देशातून पळून गेलेल्या गुन्हेगारांवर होणार कारवाई

Bharatpol in India : जाणून घ्या भारतपोल नेमकं काय आहे…

Bharatpol in India : भारतात लवकरच इंटरपोलच्या धर्तीवर ‘भारतपोल’ सुरू होणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडणे आणखी सोपे होईल. गुन्हेगार भारतात गुन्हे करुन परदेशात पळून जातात किंवा परदेशात बसून भारतात गुन्हेगारी सिंडिकेट चालवतात, अशा गुन्हेगारांविरुद्ध भारताला थेट कारवाई करता येणार आहे. 7 जानेवारी रोजी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होईल.

भारतपोलचे उद्दिष्ट केवळ गुन्हेगारांना पकडणेच नाही, तर वेळीच त्यांच्याविरोधातील फास आवळणे आणि गुन्ह्यांची पाळेमुळे उखडून टाकणे, हा आहे. हे एक प्रगत ऑनलाइन पोर्टल आहे, जे सीबीआयने तयार केले आहे. त्याची चाचणी झाली असून, औपचारिक सुरुवात होणे बाकी आहे. Bharatpol in India

इंटरपोल काय आहे?
इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देशांच्या पोलिसांमध्ये समन्वय साधणारी ही संघटना असून, यात 195 देशांच्या तपास यंत्रणा सामील आहेत. याद्वारे गुन्हेगारांच्या माहितीची देवाणघेवाण केली जाते आणि त्यांना अटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नोटिसा बजावल्या जातात.

इंटरपोल काय काम करते?
समजा एका माणसाने भारतात गुन्हा केला आणि स्वित्झर्लंडला पळून गेला. आता अडचण अशी आहे की, भारतीय पोलिसांना स्वित्झर्लंडमध्ये कारवाई करता येत नाही. अशा स्थितीत गुन्हेगाराला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत गेतली जाते. त्या आरोपीची माहिती भारत इंटरपोलला देतो, त्यानंतर त्याच्या नावाने नोटीस बजावली जाते. Bharatpol in India

भारतपोल काय करणार?
भारतात राज्य पोलीस आणि तपास यंत्रणांना माहिती मिळविण्यासाठी किंवा परदेशात लपलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेकदा इंटरपोलची मदत घ्यावी लागते. सध्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारकडून आधी सीबीआयशी संपर्क साधला जातो, त्यानंतर सीबीआय इंटरपोलशी संपर्क साधून आवश्यक नोटीस बजावते. ही संपूर्ण प्रक्रिया क्लिष्ट तर आहेच, पण खूप वेळही लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी भारतपोल सुरू करण्यात येत आहे.

भारतात एका दिवसांत HMPV चे 5 नवीन रुग्ण, ICMR ने दिला इशारा

Bharatpol in India

More From Author

HMPV

HMPV Cases in India: भारतात एका दिवसांत HMPV चे 5 नवीन रुग्ण, ICMR ने दिला इशारा

Suresh Dhas on

Suresh Dhas on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा; आमदार सुरेश धस यांची जहरी टीका

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत