America Fire

America Fire : अमेरिकेतील सर्वात वाईट दुर्घटना; 11 लाख कोटींचे नुकसान, 40 हजार एकर परिसराची राख

America Fire : अमेकितील लॉस एजेलिसमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.

America Fire : अमेरिकेतील लॉस एंजेलिस गेल्या 6 दिवसांपासून आगीच्या विळख्यात आहे. जंगलातून पसरणारी आग निवासी भागात पसरली असून, जवळपास 40 हजार एकर जमीन या आगीने वेढली आहे. 12 हजारांहून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटींच्या घरांचाही समावेश आहे. लॉस एंजेलिस परिसर चित्रपट तारे यांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये असलेले लॉस एंजेलिस शहरात पसरलेल्या आगीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, परंतु अमेरिकेतील सर्व वर्तमानपत्रे आणि वेबसाइट शोधल्यानंतर हे आकडे प्राथमिक असल्याचे समोर आले आहे. अनेक लोक बेपत्ता आहेत. या भीषण आगीमुळे सुमारे 2 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉस एंजेलिसमधील आग ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धोकादायक आणि महागडी आग असू शकते. या आगीमुळे 135-150 अब्ज डॉलर्स, म्हणजेच सुमारे 11 ते 13 लाख कोटी रुपये पर्यंतचे नुकसान होऊ शकते. America Fire

आगीचे नुकसान आपण भारताचे संदर्भ देऊन पाहिले तर उत्तर प्रदेश-बिहार, मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या बजेटइतके आहे. उत्तर प्रदेशचे बजेट 7 लाख कोटी रुपये आहे, तर बिहारचे एकूण बजेट सुमारे 3 लाख कोटी आणि मध्य प्रदेशचे बजेटही 3 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. या राज्यांचे बजेट एकत्र केले तर लॉस एंजेलिस आगीत अमेरिकेला एवढे नुकसान होण्याची अपेक्षा आहे. लॉस एंजेलिसमधील 6 भागात ही आग सर्वात जास्त पसरली आहे. याचा जास्तीत जास्त परिणाम पॅलिसेड्समध्ये दिसून येत आहे.

क्रिकेटच्या महाकुंभाची घोषणा; 23 मार्चपासून IPL 2025 ला सुरुवात

America Fire

More From Author

ipl 2025

IPL 2025 : क्रिकेटच्या महाकुंभाची घोषणा; 23 मार्चपासून IPL 2025 ला सुरुवात

modi

Narendra Modi Omar Abdullah : ‘तुम्ही 4 महिन्यात दिलेला शब्द पाळला, तुमचे आभारी आहोत’, ओमर अब्दुल्लांनी केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत