Welcome 2025 Happy New Year : लोकांनी नवीन वर्षाचे भव्यदिव्य स्वागत केले.
Welcome 2025 Happy New Year : 2024 ला निरोप देऊन आज संपूर्ण जग 2025 मध्ये प्रवेश करणार आहे. दरवर्षीप्रमाणे नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी जगभरात मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. भौगोलिकदृष्ट्या सर्वात आधी दिवस सुरू होणाऱ्या न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरात नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले.
31 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्री घड्याळात 12 वाजताच न्यूझीलंडच्या लोकांनी नवीन वर्षाचे भव्य स्वागत केले आणि 2025 मध्ये प्रवेश करणारा जगातील पहिला देश म्हणून साऱ्यांना सकारात्मक ऊर्जा दिली. दरम्यान, वेगवेगळ्या टाइम झोनमुळे अनेक देश वेगवेगळ्या वेळी नवीन वर्ष साजरे करतात. भारतापूर्वी असे 41 देश आहेत जिथे नवीन वर्ष साजरे केले जाते. Welcome 2025 Happy New Year
ऑकलंड न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर आणि त्याचा आयकॉनिक स्काय टॉवर येथे फटाक्यांची आतषबाजी झाली. नेत्रदीपक रोषणाईने आणि फटाक्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आकाश रंगांनी उजळून निघाल्याने हजारो लोकांनी नवीन वर्षाचे स्वागत केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. सिडनी हार्बर ब्रिजवर भव्य आतषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आणि लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नवीन वर्षाच्या निमित्ताने जगभरात नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी केली जाते. दुबई (UAE) चा बुर्ज खलिफा फायरवर्क्स शो त्याच्या तंत्रज्ञान आणि लाईटसाठी प्रसिद्ध आहे. न्यूयॉर्क (अमेरिका) मधील टाइम्स स्क्वेअरवर अनोखी आतषबाजी होईल. रिओ डी जनेरियो (ब्राझील) मधील कोपाकबाना बीच आणि कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) मधील लेक बर्ली ग्रिफिन येथे देखील विशेष कार्यक्रम होतात. Welcome 2025 Happy New Year
मोठी चूक झाली, मला माफ करा; Manipur हिंसाचाराबद्दल CM बिरेन सिंह यांनी मागितली माफी