Walmik Karad

Walmik Karad ‘Shocking’: 22 दिवसांनंतर Surrender; पुण्यात CID कडून चौकशी सुरू

Walmik Karad Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने मोठी कारवाई केली आहे.

Walmik Karad Surrender : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातीव फरार वाल्मिक कराड आज अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. वाल्मिक कराड स्वतःच्या वाहनाने सीआयडीच्या पुणे येथील कार्यालयात दाखल झाला. गेल्या 22 दिवसांपासून पोलीस आणि सीआयडी त्याच्या मागावर होते. आता इतक्या दिवसांनंतर आरोपीने आत्मसमर्पण केले आहे.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जातोय. देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. (Walmik Karad Surrender)

आज अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे कराड याने स्पष्ट केले आहे.

वाल्मिक कराडला शरण येण्यास पाडले भाग
भाजपाचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आकाने जर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ पाहिला असेल तर काय कारवाई होणार याविषयी त्यांनी मोठे विधान केले. वाल्मिक कराड हा काही स्वखूशीने शरण आला नाही. त्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार होती. त्याच्या पत्नीला चौकशीला घेऊन येणार होते. तर त्याची बँक खाती गोठवण्यात आली होती. त्यामुळे तो सीआयडीकडे शरण आल्याचा दावा आमदार धस यांनी केला. (Walmik Karad Surrender)

कराडची मालमत्ता जप्त करा
त्याच्या प्रॉपर्टी शीज करण्याची आता कोर्टाकडे सीआयडीने परमिशन मागितलेली आहे. साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही प्रक्रिया सुरू होईल. ही न्यायालयीन बाब आहे. त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही. परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज झाल्या पाहिजेत प्रॉपर्टी स्टेटस झाल्याशिवाय अन्य गुन्हे जय हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत. यांच्या प्रॉपर्टीज झाल्याच पाहिजेत अशी मागणी धस यांनी केली.

काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला संशय
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे. तसेच खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 22 दिवस पोलिस-सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. (Walmik Karad Surrender)

महाराष्ट्रातील Muslim महिलांचे UCC ला समर्थन; पण सरकारसमोर ठेवल्या 25 अटी

सौजन्य-न्यूज१८लोकमत

More From Author

UCC in Maharashtra

UCC in Maharashtra : महाराष्ट्रातील Muslim महिलांचे UCC ला समर्थन; पण सरकारसमोर ठेवल्या 25 अटी

Manipur Violence

Manipur Violence : मोठी चूक झाली, मला माफ करा; Manipur हिंसाचाराबद्दल CM बिरेन सिंह यांनी मागितली माफी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत