Walmik Karad Police Custody : वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Walmik Karad Police Custody : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात जर करण्यात आले, यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. तसेच तपास अधिकाऱ्यांनीदेखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केले. बीडच्या मकोका कोर्टात इन कॅमेरावर सुनावणी पार पडली.
कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी 9 ते 10 ग्राउंडस मांडले. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत कराडची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल जाहीर केला. वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Walmik Karad Police Custody
वकिलांचा युक्तिवाद काय?
संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराडचं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर संभाषण झालं होतं. या तीनही आरोपींमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली. संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 वाजेच्या दरम्यान अपहरण झालं होतं, असा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. त्याच दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.40 मिनिटे या काळात वाल्मिक कराडचं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर वारंवार संभाषण झाल्याचा दाखला देत सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली.
आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि मग हत्या केली आहे. या गुन्ह्यातले आरोपी सराईत आहेत. त्यांची आधीही गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहेत. आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्याला लपण्यासाठी आरोपींनी मदत केली आहे का? हे तपासायचे आहे. तीन आरोपींमध्ये १० मिनिटे नेमकं काय संभाषण झालं हे तपासायचं आहे. Walmik Karad Police Custody
वाल्मिक कराडने लाखो रुपयांचा कर थकवला
वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे. कुटुंबियांच्या नावे आणि इतरांच्या नावाने त्याने संपत्ती जमवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. पुणे शहरातही वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्तीची खरेदी केल्याचा आरोप होत आहे. त्याचवेळी त्याने पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा मिळकत कर थकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपाने त्याचा फ्लॅट जप्त करुन त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराड याचा फ्लॅट आहे. 16 जून 2021 ला वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराड याच्या नावे या फ्लॅटची नोंदणी झाली. मात्र तेव्हापासून वाल्मिक कराड याने मिळकत कर थकवला आहे. 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा हा मिळकत कर थकवल्याप्रकरणी पालिकेने वाल्मिक कराडला नोटीस ही पाठवली आहे. 21 नोव्हेंबर 2024 ला धाडलेल्या नोटिशीनंतर ही कर न भरल्याने आता हा फ्लॅट सील केला जाईल, असे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदे यांनी सांगितले.
‘पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील, PoK आमचा…’, राजनाथ सिंह यांचा इशारा
Walmik Karad Police Custody