Walmik Karad: अंजली दमानिया यांनीदेखील वाल्मिक कराडच्या डॉक्टरांबाबत धक्कादायक दावा केला आहे.
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात आता नवं ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे, अंजली दमानिया यांनी डॉक्टरांबाबत केलेल्या दाव्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.
वाल्मिक कराड याची तब्येत खालावल्यानं त्याच्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दोन दिवसांपूर्वी पण मी ट्विट केलं होतं, आणि काल जेव्हा मी त्याच्या रिपोर्टची माहिती घेतली तर त्या रिपोर्टसमध्ये त्याला काहीही झालं नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्याचे ब्लड रिपोर्ट देखील व्यवस्थित आहेत.
Walmik Karad
फक्त अँटिबायोटिक्स दिली की तो व्यक्ती अगदी व्यवस्थित होतो, आणि त्याच्या सिटीस्कॅनमध्ये देखील काही आलेलं नाही, यावरून आपल्याला कळतंय की त्याची फक्त बर्दास्त ठेवण्यासाठीच त्याला रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्याच्यासाठी 11 रुग्णांना आपले बेड खाली करावे लागले. ज्या व्यक्तीला काहीच झालं नाही, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येतं, आणि त्याच्यासाठी आकारा जण आपला बेड खाली करतात तर हे चुकीचं आहे. या प्रकरणात जे हॉस्पिटलचे अधिकारी असतील जे डॉक्टर्स असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

दरम्यान सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्याबाबत देखील दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. अशोक थोरात जे आताचे सिव्हिल सर्जन आहेत, त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते, तेव्हा मला असं कळालं की ते राजकीय इन्कलाइन पर्सन आहेत. त्यांना लोकसभेची पण निवडणूक लढवायची होती आणि विधानसभेची निवडणूक पण लढवायची होती. त्यांची आधी नाशिकला ट्र्न्सफर झाली मात्र त्यानंतर परत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला करण्यात आली, असा दावा दमानिया यांनी केला आहे.Walmik Karad
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या व्यक्तीबद्दल जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती मिळाली, आंबेजोगाई येथे एक पियुष इन नावाचे अतिशय सुपर लक्झरी असं हॉटेल आहे, त्याच्या प्रवेशद्वारावरच पंकजा मुंडे यांच्या बरोबरचा त्यांचा फोटो लावलेला आहे, असा आरोपही यावेळी दमानिया यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच वाल्मिक कराडसंदर्भात प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे. Walmik Karad

मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलटून टाकली, मात्र आम्हाला अजून हक्क मिळत नाही, जुलमी राजवटीत एवढा अन्याय झाला नाही तेवढा अन्याय या राज्यात सुरू आहे, तुम्ही आम्हाला आरक्षण दिल नाही, तर तुमचा मराठा द्वेष उघड होणार, तुम्ही मराठा विरोधी लोक आहात हे जाहीर होणार, मुख्यमंत्र्यांच्या मनात मराठ्यांच्या विरोधात राग असेल तर ते आरक्षण देणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वाल्मिक कराडवर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे. त्याला काहीही झालेलं नाही, सत्तेचा वापर करून अधिकारी पाठवले जात आहेत. षडयंत्र सुरू आहे, दवाखान्यात नेऊन सोडण्याचं ऑपरेशन सुरू आहे. आता सरकारने एक काम करावे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढावेत, त्याच्या ड्रायव्हरचे सीडीआर काढा. तो दुसऱ्यांच्या फोनवरून बोलतो, गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला चादरी नेऊन दिल्या. त्यांचीही चौकशी करा.Walmik Karad
सगळया आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. सगळ्यांकडे भरपूर माहिती आहे, या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा, सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा, प्रकाश आबिटकर यांना विनंती आहे, कराड याचं दुखत नसताना देखील त्याचे डॉक्टर त्याचं दुखत असल्याचं सांगत आहेत. त्यांची चौकशी करा, त्याच दुखत नसताना त्याला दवाखान्यात का ठेवलं आहे? वाल्मीकला गुन्ह्यातून सोडण्यासाठी डॉक्टर आणि पोलीसांनी हे षडयंत्र केलं आहे का? असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
लाडकी बहीण योजनेचे वाढीव रु. 2100 कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती
Walmik Karad