Vinod Kambli 2024

Vinod Kambli 2024 : विनोद कांबळीची तब्येत बिघडली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल

Vinod Kambli 2024 on Sachin Tendulkar : विनोद कांबळीने रुग्णालयातून एक व्हिडिओ जारी केला असून, सचिन तेंडुलकरबद्दल प्रतिक्रिया दिली.

Vinod Kambli 2024 on Sachin Tendulkar : अचानक तब्येत बिघडल्याने विनोद कांबळीला शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले

Vinod Kambli 2024 on Sachin Tendulkar: माजी क्रिकेटर विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच विनोद कांबळीने सचिन तेंडुलकरसोबत, त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यानंतर एका मुलाखतीत सचिनबाबत अनेक मोठे खुलासे केले होते. त्यावेळी विनोदची प्रकृती चांगलीच खालावल्याचे सर्वांसमोर आले होते. दरम्यान, आता विनोद कांबळीला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विनोद कांबळीची प्रकृती खराब असल्याचे काही व्हायरल व्हिडीओंमध्ये दिसले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात कांबळी आणि सचिन यांच्यातील भेटही व्हायरल झाली होती. तशातच शनिवारी विनोद कांबळीची तब्येत बिघडली आणि त्याला ठाण्यातील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्यावर उपचार सुरु असून तो बरा होत आहे. याचदरम्यान आज त्याने एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्याने सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला. (Vinod Kambli on Sachin Tendulkar)

Vinod Kambli

https://youtu.be/wT0jTTMm-3k

माझी तब्येत आता ठिक आहे. मी हळूहळू बरा होतोय. आमच्या कुटुंबात तीन डावखुरे क्रिकेटपटू आहेत. मी क्रिकेटपासून कधीही लांब जाणार नाही, कारण मी किती शतके आणि द्विशतके ठोकली आहेत, हे हे मला पक्कं लक्षात आहे. मी सचिन तेंडुलकरचे आभार मानतो. त्याचे आशीर्वाद आणि त्याचा पाठिंबा कायमच माझ्या पाठिशी आहे, असे विनोद कांबळीने एएनआयशी बोलताना सांगितले.

Swami Rambhadracharya : मोहन भागवत हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत; स्वामी रामभद्राचार्य यांची टीका

(Vinod Kambli on Sachin Tendulkar)

More From Author

Swami Rambhadracharya

Swami Rambhadracharya : मोहन भागवत हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत; स्वामी रामभद्राचार्य यांची टीका

Election Commission

Election Commission : महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह, निवडणूक आयोगाने दिले थेट उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत