UPSC Exam 2025

UPSC Exam 2025 : UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 ची अधिसूचना जारी, 979 जागांवर भरती; जाणून घ्या पात्रता निकष…

UPSC Exam 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने अधिसूचना जारी केली आहे.

UPSC Exam 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा परीक्षा 2025 ची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 979 पदांसाठी भरती केली जाणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा(IPS), भारतीय वन सेवा (IFS), भारतीय परराष्ट्र सेवा(IFS) आणि इतर प्रतिष्ठित सेवांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. उमेदवार 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी, या कालावधीत UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

यापूर्वी, 2024 मध्ये UPSC ने 1,105 जागा भरल्या होत्या, तर 2023 मध्ये 1105 आणि 2022 मध्ये 1011 पदे भरण्यात आली होती. यंदा 979 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांपैकी 38 पदे अपंग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, UPSC CSE 2025 ची प्राथमिक परीक्षा 25 मे रोजी होणार आहे. पात्र उमेदार आजपासून 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. UPSC Exam 2025

कोण अर्ज करू शकतो?
UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी किमान 21 वर्षे असावे, तर 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1993 पूर्वी आणि 1 ऑगस्ट 2004 नंतर झालेला नसावा.

अर्ज फी
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, महिला उमेदवार, SC/ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्याची गरज नाही. अर्ज केल्यानंतर उमेदवार 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणादेखील करू शकतात. UPSC Exam 2025

अर्ज कसा करावा
सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
होम पेजवर दिलेल्या OTR टॅबवर क्लिक करा.
आता नोंदणी करा आणि फॉर्म भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फी भरा आणि सबमिट करा. UPSC Exam 2025

IAS, IFS सूचना एकत्र
यावर्षी 22 जानेवारी रोजी, नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा 2025 सोबत, भारतीय वन सेवा (IFS) प्राथमिक परीक्षा 2025 साठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. दोन्ही परीक्षा UPSC द्वारे आयोजित केल्या जातात आणि उमेदवार दोन्हीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांचा नोंदणी फॉर्म विहित मुदतीत ऑनलाइन सबमिट करावा. वार्षिक कॅलेंडरनुसार, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे.

सरकारी सेवेत करिअरचा सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घेण्यासाठी आणि त्यांची तयारी मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट आणि इतर स्त्रोतांकडून नियमित माहिती घ्यावी.UPSC Exam 2025

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मोठी माहिती

More From Author

Petrol-Diesel Price

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मोठी माहिती

Modi Cabinet Decision

Modi Cabinet Decision: आधी सरकारी कर्मचारी, आता शेतकऱ्यांची चांदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत