Uddhav

Uddhav Thackeray : आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार; उद्धव ठाकरेंची घोषणा…

Uddhav Thackeray : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून महापालिकेची तयारी केली जात आहे.

Uddhav Thackeray : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून महापालिकेची तयारी केली जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वत: एकला चलो रे चा नारा दिला आहे. नुकत्याच अंधेरीत केलेल्या भाषणावेळी त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आमचे हिंदुत्व राष्ट्रवादी आहे. आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. आमचे हिंदुत्व गोमूत्रधारी नाही. अमित शहांनी त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगावी. आमच्याशी युती तोडली तेव्हा आम्ही हिंदूत्व नव्हतो. प्रबोधनकाराचा नातू आणि बाळासाहेबांचा मुलगा हिंदूत्ववादी नसेल. हिंदुत्व सोडू शकेल. मी हिंदू अभिमानी आहे. तसाच मराठीचा कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर उचलून देऊ. कपटाने वागाल तर उचलून आपटू.

बहुमताचे सरकार आले कसे, या धक्क्यातून ते आले नाही. सरकार आलं आणि नंतर पालकमंत्र्यावरून वाद सुरू. टायर जाळणे सुरू. लाज असेल तर तुम्ही निघून जा. उद्धव ठाकरेंची जागा ठरवताना तुमची जागा काय होती आणि त्यातून तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला कसे काढले हे पाहा. मी मैदानात पाठ दाखवणारा नाही. मी मैदान सोडेल तर जिंकून सोडेल. हारून तर गद्दारांच्या हातून सोडणार नाही. मी जिद्दीने उभा आहे. जे जात आहेत. रोज उद्धव ठाकरेंना धक्का. एवढे भाडोत्री घेतले तरी तुमची भूमिका बदलत नाही. वामनराव महाडिक यांच्या भाषेत विकली जाते ते विष्ठा असते, उरते ती निष्ठा असते.Uddhav Thackeray

सर्वांचे मत आहे. एकटे लढा. ताकद आहे? अमित शाहांना जागा दाखवणार आहात. ठिक आहे. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द आणि तयारी बघू द्या. ज्या भ्रमात राहिलो त्यातून बाहेर या. जेव्हा आपली खात्री पटेल आपली तयारी झाली. तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेईल. यावेळी मला सूड उगवून पाहिजे. जो मराठी मातीवर वार करतो, मराठी आईच्या कुशीवर वार करतो, तो गद्दार दिसता कामा नये. शपथ घेऊन सांगत असाल तेव्हा वेळ येईल तेव्हा एकटा लढल्याशिवाय राहणार नाही. अमित शाहांना सांगतो जास्त नादी लागू नका. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला जाल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. Uddhav Thackeray

अमित शहांवर हल्लाबोल
प्रेमाने मागाल तर आम्ही उचलून देऊ. पण कपटाने वागाल तर उचलून आपटू, असा गंभीर इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार आसूड ओढले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपची अक्षरश: पिसे काढली. आमचं हिंदुत्व राष्ट्रवादी आहे. राष्ट्रीयत्वच हेच हिंदुत्व हाच आमचा बाणा आहे. आमचं हिंदुत्व गोमूत्रधारी नाही. अमित शाह यांनी त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगावी, असा थेट सवालच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला आहे. Uddhav Thackeray

ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सातत्याने दरे गावात जात आहेत. यावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना जबरदस्त टोला लगावला. ते मुंबईतील अंधेरीत आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. गद्दारांना सांगतो तुम्ही करता काय. आज कदाचित तुम्ही जिंकला असं वाटत असेल. आज आम्ही हरलोत तरी जनता आमचं स्वागत करत आहे. गद्दार जिंकले असतील त्यांना जिंकवणारे अमित शाह आहे. यंत्रणा बेकायदेशीर वापरल्या. अमित शाह आहेत तोपर्यंत तुम्ही आहात. महापालिका होऊ द्या, तुमची काय वाट लागते ते पाहा. Uddhav Thackeray

अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून वागणूक मिळत होती. आता बसायचे तर बसा नाही तर गावाला निघून जा. मंत्रीपद नाही मिळालं गेले गावी. दावोसला नेले नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू. डोळ्यातूल आसू दिसू लागलेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. विधानसभेत आपण गाफिल राहिलो. त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. त्या काळात त्यांना अपप्रचार केला. आपण हिंदुत्व सोडलं नाही. मला सांगा हिंदुत्व सोडलं असेल तर. मी चेंबूरच्या चिता कॅम्पमध्ये भाषण केलं. तिथे मुस्लिम होते. मी हिंदीत भाषण केलं. त्यांना म्हटलं मी हिंदुत्व सोडलं का. माझं हिंदुत्व मान्य आहे का. तर ते हो म्हणाले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं उघड चॅलेंज
या निवडणुकीनंतर महाविकासआघाडीकडून सातत्याने ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी भाजपला ओपन चॅलेंज दिले आहे. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता. पण गद्दार होता. तो प्रचंड सैन्य घेऊन आला. शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं असतं. गोदी मीडिया असता तर सर्व संपलं. शिवाजी महाराजांचा काळ नाही असं सांगितलं असतं. पण शिवाजी महाराज औरंगजेबाच्या छाताडावर बसून आले. हा महाराष्ट्र आहे. लाज असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. एक तरी, असे चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिले. Uddhav Thackeray

महाराष्ट्र धर्म देशाचं आणि धर्माचं रक्षण करतो. आम्ही हिंदू आहोतच. पण महाराष्ट्र आणि मराठीच्या आड येणार नाही. तुम्ही हिंदूंच्या आड आला तर आम्ही कडवट हिंदू म्हणून तुमच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रावर प्रेम करणारं आमचं हिंदुत्व आहे. तुमचं काय आहे सांगा. जो हिंदू इस्लाम का द्वेष करतो तो हिंदू होऊ शकत नाही, असं मोदी म्हणालेत. मोहन भागवत मशिदीत जाऊन येतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Waqf Board Bill : वक्फ विधेयकाचा अहवाल अंतिम टप्प्यात; अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार विधेयक…

Uddhav Thackeray

More From Author

Waqf Board Bill

Waqf Board Bill : वक्फ विधेयकाचा अहवाल अंतिम टप्प्यात; अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार विधेयक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत