Swami Rambhadracharya

Swami Rambhadracharya : मोहन भागवत हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत; स्वामी रामभद्राचार्य यांची टीका

Swami Rambhadracharya on Mohan Bhagwat: काय म्हणाले होते मोहन भागवत? पाहा

Swami Rambhadracharya on Mohan Bhagwat: उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मंदिर सापडल्यानंतर देशभरात मंदिर-मशीद मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यावर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, दररोज मंदिर-मशि‍दीचा मुद्दा मांडला जातोय, हे योग्य नाही, असे म्हटले होते. त्यावर आता स्वामी रामभद्राचार्य यांनी टीका केली आहे.

स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, पण आपले ऐतिहासिक स्थळे दुसऱ्याला थोडी दिले पाहिजे. ही मोहन भागवत यांचे व्यक्तिगत भूमिका असू शकते. ही सगळ्यांची भूमिका नाहीये. (Swami Rambhadracharya on Mohan Bhagwat)

मोहन भागवत हे कोणत्या एका संघटनेचे प्रमुख असू शकतात, ते हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत. त्यामुळे त्यांचे म्हणणे आम्ही ऐकत नाही. ते आमचे अनुशासक नाहीत, ना आम्ही त्यांचे अनुशासक आहोत.

मी 20 वेळा सांगतो, ते हिंदू धर्म व्यवस्थेचे ठेकेदार नाहीत. हिंदू धर्म व्यवस्था हिंदू धर्माच्या आचार्यांच्या हातात आहे, त्यांच्या हाता नाहीये. ते कोणत्या एका संघटनेचे प्रमुख बनू शकतात, पण आमचे प्रमुख नाहीत. ते सगळ्या भारताचे प्रतिनिधी नाहीत, असे स्वामी रामभद्राचार्य म्हणाले. (Swami Rambhadracharya on Mohan Bhagwat)

काय म्हणाले होते मोहन भागवत?
राम मंदिर उभारल्यानंतर काही लोकांना वाटते की, ते नवीन जागांबद्दल असाच मुद्दा उचलून हिंदूंचे नेते बनू शकतात, अशी प्रतिक्रिया मोहन भागवत यांनी दिली होती.

’पुष्पा 2′ प्रदर्शनानंतर 4 आठवड्यांनंतर जानेवारी 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात स्ट्रीमर्सवर उपलब्ध होऊ शकते

Swami Rambhadracharya on Mohan Bhagwat

More From Author

World Saree Day : आज २१ डिसेंबर जागतिक साडी दिन…!!!

Vinod Kambli 2024

Vinod Kambli 2024 : विनोद कांबळीची तब्येत बिघडली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत