Suresh Dhas on

Suresh Dhas on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा; आमदार सुरेश धस यांची जहरी टीका

Suresh Dhas on Dhananjay Munde : अजित पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडेनेही राजीनामा दिला पाहिजे, असं विधान आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

Suresh Dhas on Dhananjay Munde : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडबद्दल आज मोठे विधान केले. तसेच, धनंजय मुंडेंच्या विधानावरही त्यांनी संताप व्यक्त केला. एका मुलाखतीत बोलताना आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराड, धनंजयम मुंडेंबद्दल भाष्य केले. या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? असा प्रश्न सुरेश धस यांना विचारण्यात आला होता. सुरेश धस म्हणाले, शंभर टक्के फाशी झाली पाहिजे. फाशीवर गेले पाहिजेत. यांचे जामीन नाही झाले पाहिजेत. यांची राखच बाहेर निघाली पाहिजे.

हे जर आका आत गेले, तर परळीतील राखेचे चटके बसणे लवकरच बंद होतील, असं मला वाटतं. आका आतच राहिले तर बरं होईल. नाहीतर हे काही दिवसात महाराष्ट्राचे लॉरेन्स बिष्णोई होईल. वाल्मीक अण्णा बिष्णोईचा भाऊ होऊ नये. धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना शुभेच्छा द्यायला गेले. किती वेळ कवटाळून शुभेच्छा देत होते, काय माहिती? अजित पवारांनी त्यांना मंत्री ठेवावे. आणखी एखादं मंत्रिपद द्यावं. त्यांच्याकडे वित्त व नियोजन आहे. नियोजन किंवा वित्त त्यांच्याकडे द्यावं. आमचं काही म्हणणं नाही, असंही धस म्हणाले. Suresh Dhas on Dhananjay Munde

तुमची चर्चा कशावरही होऊद्या. तुम्ही ट्रायलची भाषा वापरता ना? ट्रायल होईपर्यंत तुम्ही जा ना पदावरून बाजूला. कशाला पदावर राहता चिकटून? द्या राजीनामा स्वतःहून. अजित पवारांवर सांगण्याची वेळ कशाला येऊ देता, तुम्ही राजीनामा द्या ना. याचं काही वाटोळ होणार नाही, अजित पवारांचं होणार आहे. आम्हाला काय करायचं. अजित पवारांकडे जे लोक वळले आहेत, ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. नाहीतर नवीन नेता बघतील.

अजितदादा धनंजय मुंडे यांना पाठीशी घालतायेत. कशासाठी..? कोट्यवधीचा वाळू उपसा, परळी-गंगाखेड टप्प्यात, गाड्या कोणाच्या या लोकांच्याच..आका, आकाचे आका, आकाचे चुलत भाऊ…आम्ही राजीनाम्याची मागणी केली. 100 टक्के दादा पाठीशी घालतायेत. अजितदादा राजीनामा घेतील की नाही मला वाटत नाही. राजीनामा घ्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. अजित पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडेनेही राजीनामा दिला पाहिजे, असं विधान आमदार सुरेश धस यांनी केले आहे. Suresh Dhas on Dhananjay Munde

तसेच संतोष देशमुख यांना फायटरने मारले, कत्तीने मारले. रॉडने मारले. मी सगळे सभागृहात बोललोय. आज एसआयटीने कोर्टात मांडले. या प्रकरणातील दोषी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे. त्यांना जामीन मिळायला नको. जर आका या प्रकरणात आत गेले तर परळीत हे बंद होईल. वाल्मिकी अण्णा बिश्नोईसारखा होईल. आतापर्यंत ते त्यांच्या मतदारसंघापुरते होते. परळीपुरते तुम्हाला सहन केले. तुम्ही जिल्ह्याचे बाप झाले का, त्या लेकराला कसं मारलंय असा संतप्त सवालही सुरेश धस यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका
मंत्री धनंजय मुंडे राज्यात जातीयवाद करत आहेत, ते टोळ्या पाळत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. आमची लढाई आरक्षणाचीच आहे पण तुम्ही लोकं मारून टाकायला लागल्यानंतर बोलायचं नाही का? यात जातीचा संबंध आला कुठुन? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ही तत्परता धनंजय मुंडे आणि त्यांनी टोळ्या पाळल्या आहेत.Suresh Dhas on Dhananjay Munde

लोकांच्या पोरांची हत्या करण्यासाठी, खंडणी वसुल करण्यासाठी. ही तत्परता त्यांनी त्यावेळी दाखवायला हवी होती. संतोष देशमुख यांचा मृतदेह दोन दिवस केज येथील रुग्णालयात पडून होता. त्यावेळी मस्साजोग गाव रस्त्यावर होते, त्यांनी तत्परता दाखवायला हवी होती. त्यांचे गुंड लोक देशमुख यांच्या भावाला धमक्या द्यायला लागले, तरीही आम्ही बोलायचं नाही का? असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. Suresh Dhas on Dhananjay Munde

अनेक ठिकाणी मनोज जरांगेंवर गुन्हा नोंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी परभणी येथे निघालेल्या मोर्चानंतर उपस्थित जनतेला संबोधित करताना धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख करत व मराठा आणि वंजारा समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ भाषण मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. बीड जिल्ह्यातील वंजारा समाजसह ओबीसी समाजाने याचा निषेध नोंदवत मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहे. परळी येथील शिवाजीनगर पोलीसांत सात तास हे आंदोलन केल्यानंतर जरांगे यांच्या विरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल झाला होता. धारूर येथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Suresh Dhas on Dhananjay Munde

लवकरच भारतात स्थापन होणार ‘भारतपोल’, देशातून पळून गेलेल्या गुन्हेगारांवर होणार कारवाई

More From Author

Bharatpol in India

Bharatpol in India : लवकरच भारतात स्थापन होणार ‘भारतपोल’, देशातून पळून गेलेल्या गुन्हेगारांवर होणार कारवाई

BJP-Thackeray Alliance

BJP-Thackeray Alliance Shocking : भाजप-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? राजकारणात मोठी खळबळ

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत