Khel Ratna

Khel Ratna & Arjuna Award 2024: मनू भाकर, डी गुकेशसह 4 खेळाडूंना Honored खेलरत्न जाहीर, 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

Major Dhyanchand Khel Ratna & Arjuna Awards 2024 : मनू भाकर आणि डी गुकेश व्यतिरिक्त हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Major Dhyanchand Khel Ratna & Arjuna Awards 2024 : भारत सरकारने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची नुकतीच घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकर आणि बुद्धीबळ खेळाडू डी गुकेशसह 4 खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज (2 जानेवारी) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ची घोषणा केली. मनू भाकर आणि डी गुकेश यांच्याशिवाय हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट खेळाडू प्रवीण कुमार यांनाही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. 17 जानेवारी 2025 (शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान केले जातील.

क्रिकेटला यंदा एकही पुरस्कार नाही
यावेळी खेळरत्न आणि ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांमध्ये एकाही क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला नाही. याशिवाय, क्रिकेटशी संबंधित कोणत्याही व्यक्तीचे नाव प्रशिक्षकाच्या श्रेणीतही समाविष्ट करण्यात आले नाही. (Major Dhyanchand Khel Ratna & Arjuna Awards 2024)

या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024

  1. डी गुकेश (बुद्धिबळ)
  2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
  3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
    ४. मनू भाकर (शूटिंग)

‘खेलरत्न’ मिळालेल्या चार खेळाडूंची थोडक्यात माहिती

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक मिळवले, तर सरबज्योत सिंगसोबत 10 मीटर सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे, क्रीडा महाकुंभाच्या एकाच मोसमात दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू ठरली.

डी गुकेश हा बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून तो विश्वविजेता ठरला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून भारताची मान उंचावली. सलग तिसऱ्यांदा पुरुष संघाला हा पुरस्कार मिळाला आहे.

प्रवीणने पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. (Major Dhyanchand Khel Ratna & Arjuna Awards 2024)

अर्जुन पुरस्कार

  1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
  2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
  3. नीतू (बॉक्सिंग)
  4. स्वीटी (बॉक्सिंग)
  5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
    ६. सलीमा टेटे (हॉकी)
  6. अभिषेक (हॉकी)
  7. संजय (हॉकी)
  8. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
  9. सुखजित सिंग (हॉकी)

(Major Dhyanchand Khel Ratna & Arjuna Awards 2024)

  1. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
  2. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
  3. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
  4. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
  5. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
  6. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
  7. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
  8. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
  9. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
  10. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
  1. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
  2. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
  3. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
  4. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
  5. कपिल परमार (परा ज्युदो)
  6. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
  7. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
  8. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
  9. सरबज्योत सिंग (शूटिंग)
  10. अभय सिंग (स्क्वॉश)
  11. साजन प्रकाश (पोहणे)
  12. अमन (कुस्ती)

(Major Dhyanchand Khel Ratna & Arjuna Awards 2024)

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन)

  1. सुचा सिंग (ॲथलेटिक्स)
  2. मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)

  1. सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
  2. दीपाली देशपांडे (शूटिंग)
  3. संदीप सांगवान (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  1. एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)
  2. अरमांडो ऍग्नेलो कोलाको (फुटबॉल)

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

  1. फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया

(Major Dhyanchand Khel Ratna & Arjuna Awards 2024)

 अमेरिकेत भीषण अपघात; नववर्ष साजरा करणाऱ्यांना ट्रकने चिरडले, 12 ठार अन् 30 जखमी…

More From Author

Ajit Pawar Sharad Pawar

Ajit Pawar Sharad Pawar : शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? राष्ट्रवादी प्रमुखांच्या मातोश्रीचे विधान चर्चेत…

UPA vs NDA

UPA vs NDA: भाजप सरकारच्या 10 वर्षांच्या काळात मिळाले सर्वाधिक रोजगार, केंद्रीय मंत्र्यांनी आकडेवारी मांडली

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत