Shocking News -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजनेतील लाभार्थी महिलांना सरकारकडून दरमहा १५०० रुपये दिले जातात.
Shocking News -मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर या योजनेतील लाभार्थी महिलांना १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये म्हणून वाढीव रक्कम देऊ असं आश्वासन सरकारकडून देण्यात आल्या होत. या योजनेचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे. त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे.
या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये राज्यातील अनेक शेतकरी महिलांचा समावेश आहे. ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. त्यांना 1500 रूपये न मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसणार आहे.
Shocking News -केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 19 लाख 20 हजार 85 हजार लोक घेत आहेत. या योजनेचा लाभे घेणाऱ्या महिलांनी देखील लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला होता. त्यानुसार त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत होते. मात्र आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा फेर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या अर्जाबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. त्या अर्जांची छाननी केली जाणार आहे.
त्यामुळे जर सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना 1500 रूपये न मिळण्याची तरतूद आहे, असा निकष लावला जर या शेतकरी महिलांना लावला तर 19 लाख 20 हजार 85 हजार शेतकरी बहिणींवर लाभ कपातीची टांगती तलवार येऊ शकते. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहिण योजनेला लाभ घेऊ द्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे.
Shocking News – शेतकरी सन्मान योजनेत सुमारे 20 लाख राज्य शासनाच्या कृषी थेट लाभ हस्तांतरण योजनेतील 10 लाख 90 हजार 465 जणांना या नियमांचा फटका बसण्याची शक्यता आहे. या तिन्ही योजनेतील 30 लाख 10 हजार 550 शेतकरी बहिणींना याचा फटका बसल्यास त्यांची मोठी हिरमोड होणार आहे.
तर अर्ज बाद होण्याचे कोणकोणते निकष आहेत ते ही जाणून घेऊ
१) सर्वप्रथम तुमच्या कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असू नये.
२) कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी वाहन नसावे.
३) ज्या सदस्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पद्धतीने अर्ज केले असल्यास त्यांचा अर्ज बाद करण्यात येईल.
४) इतरत्र एका सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
५) ज्या महिला महाराष्ट्र राज्यातून लग्न करून इतर देशात अथवा राज्यात स्थायिक झाल्या असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
वरील दिलेल्या निकषाला डावलून ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेचा फायदा घेत आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार आहे.
Shocking News