Satish Wagh Case

Satish Wagh Case: धक्कादायक! मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध; मोहिनी वाघने दिली पतीच्या हत्येची सुपारी…

Satish Wagh Case: पोलिसांनी सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Satish Wagh Case: भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा, सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ (वय 45) हिला अटक केली आहे. पत्नी मोहिनी हिनेच सतीश वाघ हिनेच हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

9 डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचे पहाटेच्या सुमारास अपहरण आणि हत्या करण्यात आली होती. अपहरण केल्यानंतर चालत्या गाडीतच त्यांचा तीक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाणकरून व गळा दाबून खून करण्यात आला. थेट गाडी शिंदवणे घाटात नेली, तिथे मृतदेह टाकण्यात आला. या खून प्रकरणात खून पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली होती. त्यामध्ये वाघ यांच्या घराजवळच राहणाऱ्या एका आरोपीचाही समावेश आहे. (Satish Wagh Case)

सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्नही झाले होते. याप्रकरणी एकूण पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी मोहिनी सतीश वाघ यांच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर ती देखील या गटात सहभागी असलेल्या समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

पत्नीचे लहान मुलाशी प्रेमसंबंध
याप्रकरणी पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. आरोपी मोहिनी वाघ हीचे आपल्याहून पंधरा वर्षांनी लहान असणाऱ्या अक्षय जावळकरसोबत प्रेम संबंध होते. त्यात आडकाठी ठरत असल्यामुळेच सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आला. मोहिनी वाघ 45 तर आरोपी प्रियकर अक्षय 32 वर्षाचा आहे. अक्षय जावळकर, हा मोहिनी यांच्या मुलाचा जिगरी दोस्त होता. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांपासून मोहिनी आणि अक्षयचे अनैतिक संबंध होते. (Satish Wagh Case)

दोघांचे संबंध समजल्यानंतर सतीश वाघ, मोहिनी आणि अक्षय यांच्यात वाद झाले. मागील अनेक वर्षे त्यांच्यात हे वाद सुरू होते. शिवाय सतीश वाघ हे पत्नी मोहिनीला मारहाण करायचे. त्यामुळे मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचे ठरवले. अक्षयच्या मदतीने तिने हत्येचा कट रचला. अक्षयने पैशाचे आमिष दाखवून त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतले. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचे कारमधून अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी अवघ्या काही मिनीटातच त्यांची हत्या केली .त्यांच्या शरीरावर तब्बल 70 वार करण्यात आले.

INDIA आघाडीत वादाची ठिणगी, काँग्रेसलाच बाहेर काढण्याच्या हालचाली

(Satish Wagh Case)

More From Author

Shah

Amit Shah: अमित शहांच्या निधनाची खोटी बातमी, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Delhi Election 2024

Delhi Election 2024: आता गुलाल भाजपचाच; दिल्ली काबीज करण्यासाठी RSS ने आखली रणनीती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत