Santosh Deshmukh Incident

Santosh Deshmukh Incident: वाल्मिक कराड अडचणीत, सहकाऱ्याने पोलिसांसमोर कबूल केला 5 गुन्हे

Santosh Deshmukh Incident: कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Santosh Deshmukh Incident: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या तसेच पवनचक्कीला दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील विष्णू चाटे याच्या पोलिस कोठडीत आहे, त्यांने दिलेल्या माहितीनंतर आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे.

खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, वाल्मिक कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचे चाटे यानी कबुली देताना म्हटलं आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे. विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार दिली होती, कराडने पवचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटे याने कबूल केलं आहे, त्यामुळे कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Santosh Deshmukh Incident

बीडच्या दोन कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे, खंडणी प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडच्या अडचणी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीमध्ये कबुली दिलेली आहे, वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांची फोनवरती संभाषण केलं होतं, वाल्मिक कराड याचं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं, अशी कबुली विष्णू साठे यांनी दिलेली आहे, सीआयडी न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा त्यांनी केला आहे, विष्णू चाटेच्या फोनवरून कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार केली होती, कराडने कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केले असल्याचा देखील विष्णू साठे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खंडणी प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडचा थेट संबंध याद्वारे जोडला गेलेला आहे, पीसीआरसाठीची मागणी केलेली होती, त्या पीसीआरचा रिपोर्ट समोर आला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, विष्णू साठे आणि जी खंडणी मागितली होती, ती त्याच्या स्वतःच्या फोनवरून मागितली होती. त्यावेळी तिथे वाल्मिक कराड देखील उपस्थित होता. त्याच्या फोनवरून वाल्मिक कराड याने संबंधित अधिकाऱ्यांना खंडणी मागितली होती, असं स्पष्ट झालं आहे. सीआयडी तपासामध्ये विष्णू चाटे याने तशा प्रकारची माहिती दिली आहे याचा उल्लेख सीआयडीच्या रिपोर्टमध्ये आहे. विष्णू चाटे यांनी दिलेल्या कबुली जबाबमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी निश्चित वाढणार असल्याचं चित्र आहे. या रिपोर्टनुसार वाल्मिक कराड यानी खंडणी मागितली होती आणि त्यामुळे आता कराड वरती असलेला आरोप काटे यांनी मान्य केल्याचं दिसून येत आहे.
Santosh Deshmukh Incident

कराडला स्पेशल ट्रिटमेंट द्यायला कोर्टाचा नकार

वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती होती. वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. ऑक्सीजनसारखं मशीन त्याला दररोज लावलं जात ते चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडने केली होती. रुग्णाला अशावेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते. मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे विनंती केली होती. पण न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आहे.

धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा निर्णय

वाल्मिक कराड हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. गेली अनेक वर्षे ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन करत आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही, असे बोलले जाते. मात्र, याच ‘राईट हँड’मुळे आता धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
Santosh Deshmukh Incident

Santosh Deshmukh Incident
राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना याविषयी भाष्य केले. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करुन आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले. दोन पवार एकत्र यावे न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय, कोणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा आहे. मंत्री मंडळात खातेवाटपावरुन कोणतीही नाराजी नाही. मी सुद्धा मिळालेल्या विभागावर नाराज नाहीय. मी आता माझ्या वडिलांची दुष्काळ हटवायण्याची इच्छा पूर्ण करू शकेन, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली आकडेवारी

More From Author

FDI in Maharashtra

FDI in Maharashtra: परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपयांची आकडेवारी CM देवेंद्र फडणवीसांनी दिली

Maharashtra politics

Maharashtra politics: राज्यात महायुतीच सरकार कोसळणार, 5 मोठ्या घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत