Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्येविरोधात मस्साजोगच्या नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केले.
Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसा ढवळ्या अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेला 24 दिवस झाले, तरीही या प्रकरणातील 4 आरोपीना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. आता या निषेधार्थ देशमुख कुटुंबीय व मस्साजोगच्या नागरिकांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी मस्साजोग येथील तलावात सामूहिक जलसमाधी आंदोलन केले.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी हातात संतोष देशमुख याचे फोटो घेऊन घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तहसीलदारांसह जिल्ह्याच्या एसपींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.Santosh Deshmukh Case
मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय व गावाकऱ्यांनी बुधवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून मस्साजोग शिंदी रस्त्यावरील तलावातील पाण्यात उतरून सामूहिक जलसमाधी आंदोलन सुरु केल्या नंतर दिड तासांनी आंदोलन स्थळी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी भेट देऊन गावाकरी व देशमुख कुटुंबियांशी संवाद साधून उर्वरित आरोपी पकडण्यासाठी आठ दिवसाचा वेळ द्या, सर्व आरोपीना अटक केली जाईल. या आश्वासनानंतर सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे घेतले. Santosh Deshmukh Case
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. जरांगे पाटील म्हणाले, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अजूनही मुख्य आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींना अटक होऊन न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. वाल्मीक कराड याला अटक झाली आहे. आता मोठे मासे सापडती, आरोपींना अटक नाही झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
या प्रकरणात पोलिस कुणालाही सोडणार नाहीत. यावेळी धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला, यावर बोलताना जरांगे म्हणाले, चौकशी सुरु आहे. संबंध आहे की नाही हे सिद्ध होईलच. यामध्ये जे जे येतील त्यांना सु्ट्टी दिली तर महाराष्ट्र बंद पाडणार, असंही जरांगे पाटील म्हणाले. Santosh Deshmukh Case
नवीन वर्षात शेतकऱ्यांना बसणार मोठा झटका, डीएपीची किंमत वाढणार
सौजन्य-टीव्ही९मराठी