Sai Baba: श्री साई बाबा मंदिर शरणापुर येथून सलग 14 व्या वर्षी पालखी सह पदयात्रा वाजत गाजत शेकडो भक्तांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात शिर्डी कडे प्रस्थान झाली.
सर्व प्रथम पूजा करून श्री साईबाबा मंदिर संस्थान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आदमाने पाटील यांच्या व सर्व मान्यवर साईभक्त पालखी समिती यांच्या हस्ते व उपस्थितीत महाआरती करण्यात आली व त्यानंतर अध्यक्ष राजेंद्र आदमाने पाटील यांनी सर्व भक्तांना मार्गदर्शन केले व शुभेछा दिल्या व त्यानंतर लगेच पालखी प्रस्थान झाली. Sai Baba

ही पालखी सह पदयात्रा 1 जानेवारी 2025 ला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी येथे साई बाबा मंदिरात पोहचते व शिर्डी येथे देखील मोठ्या उत्साहात शिर्डी येथील खंडोबा मंदिरातून मिरवणूक कडून पालखी साईबाबा समाधी मंदिरात पोहचते. अचूक नियोजन कोणत्याही भक्तांना कसला ही त्रास किंवा कोणत्या ही सुविधेचा अभाव जाणवत नाही, हे या पालखीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
सर्व साईभक्त देखील संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आदमाने पाटील साहेब यांनी दिलेल्या सर्व सूचना पाळून काटेकोर पणे शिष्तीचे पालन करतात.पालखी मध्ये सोबत सर्व अचूक व्यवस्था वाहने देखील आहेत. Sai Baba

आज या प्रस्थान सोहळा वेळी श्री साई बाबा मंदिर शरणापुर चे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र आदमाने,कार्याध्यक्ष विशाल आदमाने पाटील,साई पालखी समिती सर्व सदस्य,पंचक्रोशीतील सर्व मान्यवर साईभक्त महिला व सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sai Baba