Rohit Pawar Clear Advise: आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आर.आर.आबा आणि विलासराव देशमुखांचे नाव घेत मुंडेंना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.
Rohit Pawar Clear Advise -मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सुत्रधार म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळच्या वाल्मिक कराडवरती ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात देखील हे प्रकरण तापले आहे. अशातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आर.आर.आबा आणि विलासराव देशमुखांचे नाव घेत मुंडेंना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. Rohit Pawar Clear Advise
या प्रकरणात कोणीही राजकीय भूमिका घेऊ नये. देशमुख कुटुंबावर मोठा अन्याय झालेला आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. गेल्या महिन्याभरात आम्ही कारवाई करू ऐकण्यात येत आहे. पण, कारवाई अद्याप झालेली दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय बोलणं कमी आणि काम करणं जास्त गरजेचं आहे. लवकरात लवकर ज्या लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
ज्या व्यक्तींना ताब्यात घेतलेले आहे, त्यांना खंडणी प्रकरणात ताब्यात घेतलेला आहे, खंडणी मागत असतानाच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यामुळे खंडणी प्रकरणात ताब्यात घेतलेले आरोपी आणि त्या कंपनीचा आणि हत्या या प्रकरणात सहभाग असलेल्या वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर 307 कलम लावण्याची गरज आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, देशमुख कुटुंबाला न्याय दिला गेला पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. Rohit Pawar
Champions Trophy 2025 : मोठी माहिती! पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद काढले जाणार, कारण…
Rohit Pawar Clear Advise
बबन गीते यांना अडचणीत आणले होते, त्यावेळी मी वाल्मिक कराडचे नाव घेतले होते. तिथे सगळे निर्णय वाल्मिक कराड घेतात हे मी सांगत होतो. त्याचवेळी कराडवर कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती. तेव्हा देखील सांगितले होते वाल्मिक कराड शिवाय कुठे काही चालत नाही, तिथे निर्णय हे वाल्मिक कराड घेतात. दुर्दैवाने आज देखील आपण त्या बाबतीत पुन्हा चर्चा करतोय. मात्र या प्रकरणात संतोष देशमुख यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचा जीव गेलेला आहे. परत एकदा त्याच विषयावर आपण चर्चा करतोय.
त्यावेळी जर सरकारने मी जर जे बोलतोय त्यावर कारवाई केली असती. तर संतोष देशमुख जिवंत असले असते. दुर्दैव असं की सरकारने त्याबाबतीत कोणती कारवाई केली नाही. बीडमध्ये वाल्मीक कराड शिवाय कोणता निर्णय घेतला जात नाही. अधिकाऱ्याला आणायचा असेल, अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल, एखादे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल, बिस्किट विकायचे असले तरी वाल्मिक कराडला सांगितल्याशिवाय आपल्याला ते विकता येत नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. Rohit Pawar
धनंजय मुंडे तुम्ही नेते आहात. तुम्ही याच्यामध्ये नसाल देखील, पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला आहे. लोकांच्याशी भावना झालेली आहे. सरकारकडून या बाबतीत योग्य प्रकारे शहानिशा केली जाणार नाही यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो देशमुख कुटुंबाला न्याय मिळू शकत नाही असं सगळ्यांचं मत होऊ शकतं. त्यामुळे नैतिकच्या आधारावर ज्याप्रकारे विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आर.आर.पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्टट्रॅक वरती कराड आणि बाकी सहा सात आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केला आहे. Rohit Pawar
Rohit Pawar Clear Advise