Ram Mandir Donation

Ram Mandir Donation : श्रीराम मंदिरात 5 हजार कोटींचे दान; कोट्यवधी भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

Ram Mandir Donation : वर्षभरात 3 कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे.

Ram Mandir Donation : उत्तर प्रदेशातील श्रीराम जन्मभूमी अयोध्येत उभारलेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने हजारोच्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले. हिंदू पंचांगातील ‘तिथी’नुसार यंदाचा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामललावर अभिषेक केला.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीनंतर मागील वर्षभरात देश-विदेशातील कोटवधी भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले. या मंदिराचे तीन मजले पूर्ण झाले आहेत. सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. गेल्या वर्षभरात रामललाचरणी किती कोटींचे दान आले, याबाबत काही आकडेवारी समोर आली आहे. Ram Mandir Donation

राम मंदिराच्या दानपेटीत आतापर्यंत 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची देणगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मते, मंदिराच्या समर्पण निधी बँक खात्यात आतापर्यंत 3,200 कोटी रुपये जमा झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 18 कोटी रामभक्तांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी दान दिले आहे.

कथाकार मोरारी बापूंनी 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हे आतापर्यंतची सर्वाधिक दान असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिका, कॅनडा आणि युके येथे राहणाऱ्या मोरारी बापूंच्या विविध अनुयायांनी एकत्रितपणे 8 कोटी रुपयांची देणगी दिल्याचे म्हटले जात आहे. हिरे कंपनी श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक गोविंदभाई ढोलकिया यांनी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. दुसरीकडे दररोज दर्शन घेणासाठी आलेल्या भाविकांकडून कोट्यवधींचे दान हे मंदिराच्या दान पेटीत टाकले जात आहे. Ram Mandir Donation

‘तुम्ही 4 महिन्यात दिलेला शब्द पाळला, तुमचे आभारी आहोत’, ओमर अब्दुल्लांनी केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक

More From Author

modi

Narendra Modi Omar Abdullah : ‘तुम्ही 4 महिन्यात दिलेला शब्द पाळला, तुमचे आभारी आहोत’, ओमर अब्दुल्लांनी केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक

India Bangladesh

India Bangladesh Relation : भारत-बांग्लादेश तणाव वाढला, दोन्ही देशांनी उच्चायुक्तांना समन्स बजावले

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत