Rajasthan

Rajasthan : आजारी पत्नीची सेवा करण्यासाठी घेतली निवृत्ती, शेवटच्या दिवशी नियतीने केला घात

Rajasthan : निवृत्तीच्या दिवशीच झाला पत्नीचा मृत्यू.

Rajasthan : राजस्थानच्या कोटा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. आजारी पत्नीची सेवा करण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. पण, नोकरीच्या शेवटच्या दिवशीच त्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला. नोकरीच्या शेवटच्या दिवशी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांसमोर आजारी पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

पुंछमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र चंदन सेंट्रल वेअरहाऊसमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. पत्नीच्या आजारपणामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मंगळवारी त्यांचा कार्यालयातील शेवटचा दिवस होता. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयातच एक छोटेकानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देवेंद्रसोबत त्यांची पत्नी दीपिकाही येथील कार्यालयात पोहोचल्या होत्या.

कार्यक्रमात सर्वांनी या जोडप्याचे स्वागत केले आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. पण, यादरम्यान अचानक दीपिका यांची प्रकृती खालावली आणि त्या खाली कोसळल्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे देवेंद्र यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

More From Author

Muslim population

Muslim population India: 2050 पर्यंत भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढणार; हिंदूंची संख्या किती असेल? पाहा…

Affordable Cars

Affordable Cars: भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत फक्त रु. 3.99 लाखांपासून सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत