BJP-Thackeray Alliance :विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. आधी मुख्यमंत्री पद, नंतर मंत्रीमंडळ आणि आता पालकमंत्रीपदावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे.
BJP-Thackeray Alliance -विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार कमबॅक करत १३२ जागेवर विजय मिळवला. तर शिंदेंच्या सेनेने ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागांवर विजय मिळविल्यानंतर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष बॅकफुटला गेले आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याला कारण ठरत आहेत ते म्हणजे मिलिंद नार्वेकर यांचे ट्वीट
BJP-Thackeray Alliance -शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा ठाकरे गटाचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर भाजपसोबत जवळीक वाढवताना दिसत आहेत. ते युती जोडो अभियान चालवत असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर त्यांनी 28 नोव्हेंबरला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचंही अभिनंदन केलं होतं.
फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील शुभेच्छा दिल्या होत्या. एवढंच नव्हे तर अलीकडेच वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर मिलिद नार्वेकर यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं. ठाकरे गटाचे निकटवर्तीय असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची ही भूमिका पाहता, ठाकरे गट आणि भाजप आगामी काळात एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा सुरू आहेत.
या घटना इतपत थांबत नाही तर माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पक्षाचा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रेमभंग झाला, तर राज्यात भाजप आणि ठाकरे गटात नवीन प्रेम कहाणी सुरू होईल असं वक्तव्य बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. शिवाय त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्यात.
भाजप ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारलं असता बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण देत म्हणल आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचा प्रेमभंग झालाच, तर उद्धव ठाकरेंसोबत भाजपची नवीन प्रेमाची कहाणी सुरू होऊ शकते. त्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. मोठ्या माशांखाली लहान मासे असतात, ते मोठ्या माशाला कुरतडून खात असतात. पण एक दिवस असा येतो की हा मोठा मासा लहान माशांना पूर्ण नष्ट करतो, अशी भाजपची एकंदरीत रणनीती आहे.
या निवडणुकीत विरोधक तर खल्लास झाले. पण मित्र पक्ष देखील केवळ दिसायला युतीत आहेत. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या अंतर्मनाला विचारलं, तर त्यांचं भाजपबद्दल अंतर्मन काय आहे, हे लक्षात येईल. यांची नार्को टेस्ट झाली, तर भाजपबद्दल त्यांच्या मनात काय आहे, हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे नक्की सांगतील. अस बच्चू कडू यांनी म्हटल आहे. शिवाय त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे
सौजन्य – BBC NEWS.
BJP-Thackeray Alliance