Plane Crashes in Kazakhstan : कझाकिस्तानच्या विमानतळावर घडली दुर्दैवी घटना.
Plane Crashes in Kazakhstan : कझाकिस्तानच्या अकताऊ विमानतळाजवळ अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानात 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. यातील 42 जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर अनेकजण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढू शकतो. अझरबैजानी विमान बाकूहून ग्रोझनीला जात होते, असे कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कझाकिस्तानमधील अकताऊ विमानतळाजवळ शहरातील एअरपोर्टवर लँडिंगदरम्यान विमान कोसळले आणि विमानाताला मोठी आग लागली. या विमानात 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. त्यापैकी बहुतेक अझरबैजानी आणि रशियन नागरिक होते, असे सोशल मीडियाद्वारे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अकाटूपासून तीन किलोमीटर अंतरावर इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमान कोसळले. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, सध्या विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असून प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत काही जण सुदैवाने बचावले आहेत. Plane Crashes in Kazakhstan
शब्दांचे धनी; सदैव अटल राहणारे राजकारणाचे भीष्म पितामह, वाजपेयींचे न ऐकलेले किस्से…
अपघाताचे व्हिडिओ समोर आले
विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये हे विमान हवेत फिरताना दिसत आहे. त्याची उंची झपाट्याने कमी होते. काही सेकंदात ते जमिनीवर आदळते आणि मोठी आग लागते. आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये जमिनीवर आदळल्यानंतर विमानातील आग विझवली जात आहे. यावेळी, काही प्रवासी विमानातून बाहेर येताना दिसत आहेत, तर बचाव पथक विमानात अडकलेल्या इतर प्रवाशांना वाचवताना दिसत आहे. हे प्रवासी दहशतीत असून जखमी झालेल्यांना वेदना होत असल्याचे दिसून येत आहे.
पक्ष्यांच्या धडकेने अपघात?
अपघातानंतर लगेचच काही लोक जखमी अवस्थेत दोन तुकड्यांमध्ये विभागलेल्या विमानातून बाहेर येताना दिसले. अपघाताची दहशत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अग्निशमन आणि बचाव पथकाने शर्थीचे काम हाती घेत विमानातील आग विझवली. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासाचा हवाला देत स्थानिक अधिकाऱ्यांनी पक्ष्यांच्या धडकेने हा अपघात झाल्याचे सांगितले. न्यूज आउटलेट ऑर्डाने साक्षीदारांच्या हवाल्याने सांगितले की पक्षी विमानाच्या एका इंजिनला धडकले, ज्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर फुटला.
Plane Crashes in Kazakhstan