Nylon Manja Accident : छत्रपती संभाजीनगरच्या सुधाकर नगरमध्ये गंभीर घटना घडली आहे.
Nylon Manja Accident : संक्रांतीच्या काळात देशभरात अनेक ठिकामी पतंग उडवले जातात. हे पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. पण, यामुळे अनेक ठिकाणी गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. आत अशाच प्रकारची घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. कर्तव्यावर निघालेल्या PSI चा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला आहे. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पारधे स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर दुचाकीने निघाले होते. सुधाकर नगर मधून जात असतानाच अचानक मांजाने त्यांचा गळा कापला गेला. स्थानिकांनी धाव घेत त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही घटना इतकी गंभीर होती की पारधे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. (Nylon Manja Accident)
घटनेनंतर त्यांच्यावर तातडीने खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.
महिलेचा मांजाने कापला गळा, 40 टाके
काही दिवसांपूर्वी शहरात एका महिलेचा नायलॉन मांझाने गळा चिरल्याची घटना घडली होती. 6 जानेवारी रोजी सायंकाळी मोंढा नाका उड्डाणपूल परिसरात महिला पतीसह दुचाकीवरून क्रांती चौकाकडे जात होत्या. मोंढा नाका उड्डाणपूल परिसरात अचानक मांजा आला आणि काही कळण्याच्या आतच विजया यांचा गळा कापला गेला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Nylon Manja Accident)
मांजामुळे गंभीर जखम झाली होती. गळ्याच्या छोट्या रक्तवाहिन्याही कापल्या गेल्या. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया सुरू झाली. रात्री 11 वाजेच्या सुमारास ती पूर्ण झाली. सुमारे 40 टाके व रक्ताची एक पिशवीही द्यावी लागली. दुसऱ्या एका घटनेत मांजामुळे एका 19 वर्षीय तरुणाच्या गळ्यापासून तर मानेपर्यंतचा भाग कापला गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी टीव्ही सेंटर चौक परिसरात घडली. या जखमेला तब्बल 35 टाके द्यावे लागले.
नाशिकमध्ये नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी
पाथर्डी फाट्याकडून देवळाली कॅम्पकडे दुचाकीवरून मंगळवारी (दि. 14) सोनू किसन धोत्रे हा युवक जात असताना पाथर्डी सर्कललगत रस्त्यावर मांजाने गळा कापला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आठवडाभरात वडाळारोड भागात दोन दुचाकीस्वार नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. एका युवकाच्या गळ्यावर 75 टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. (Nylon Manja Accident)
मोठी बातमी! वाल्मिक कराडवर मकोका; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी