Nitesh Rane EVM : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य चर्चेत आहे.
Nitesh Rane EVM : भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एका सभेत मुस्लिम समाजाला लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ईव्हीएममुळे आमचा विजय झाला आणि आम्ही ते नाकारत नाही, पण ईव्हीएमचा अर्थ समजून घेण्यात विरोधकांना अपयश आल्याचे ते म्हणाले.
सांगलीतील हिंदू गर्जना सभेत बोलताना भाजप नेते म्हणाले की, आम्ही ईव्हीएममुळे निवडणुका जिंकलो आणि आम्ही हे कधीच नाकारले नाही, मात्र ईव्हीएमचा अर्थ समजून घेण्यात विरोधकांना अपयश आले. EVM चा अर्थ Every Vote against Mulla असा आहे. आमचे विरोधक ईव्हीएमबाबत कशी ओरड करतात ते तुम्हाला माहीत आहे. हिंदू एकत्र येऊन हिंदूंना कसे मतदान करत आहेत हे त्यांना पचनी पडत नाही. ते नेहमी ईव्हीएमला दोष देतात. त्यांना ईव्हीएमचा अर्थ कळत नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. त्यामुळेच आम्ही ईव्हीएममुळे निवडून आल्याचे अभिमानाने सांगत आहोत. Nitesh Rane EVM
‘मला पराभूत करण्यासाठी सौदीकडून निधी आला’
निवडणूक जिंकण्यासाठी आम्हाला मुस्लिमांच्या मतांची गरज नाही, असा दावा नितीश राणे यांनी केला. मी मुस्लिम समाजात मते मागायला गेलो नाही. मी त्यांना वाट्टेल ते करा, असे सांगितले, पण यावेळी हिंदू जागरूक झाले आणि त्यांनी आम्हाला जिंकून दिले आहे. मी एक कट्टर हिंदू नेता आहे आणि मी नेहमीच त्यांच्यावर टीका केली आहे, म्हणून त्यांनी मला पराभूत करण्याची योजना आखली. मला पराभूत करण्यासाठी सौदी आणि मुंबईतून निधी जमा झाला, पण हिंदू त्यांच्यापुढे झुकले नाहीत. लव्ह जिहादवर बोलताना भाजप नेते म्हणाले की, जेव्हा आम्ही महाराष्ट्रात लव्ह जिहाद पीडितांना भेटलो तेव्हा आम्हाला कळले की ते पैशाचा वापर करून आमच्या बहिणींचे जीवन कसे उद्ध्वस्त करतात.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यभरात नितीश राणेंच्या नेतृत्वाखाली डझनभर हिंदू आक्रोश मोर्चांनी निदर्शने केली. भाजप त्यांना महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पोस्टर बॉय म्हणून सादर करत आहे. नितेश हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, त्यांनी 52 हजार मतांनी निवडणूक जिंकली. त्यांचे थोरले भाऊ नीलेश कुडाळचे आमदार आहेत आणि वडील रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आहेत.
गुगल मॅपने दिला धोका; चोराचा पाठलाग करणारे पोलिस थेट नागालँडला पोहोचले
Nitesh Rane EVM