Naxal Chalapati Encounter : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांचे सर्वात मोठे ऑपरेशन
Naxal Chalapati Encounter : गरियाबंद जिल्हा छत्तीसगडच्या शेवटच्या टोकाला वसलेला आहे. ओडिशाच्या सीमेवर वसलेला हा जिल्हा 2025 मध्ये नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोठ्या ऑपरेशनमुळे चर्चेत आहे. सुरक्षा दलाच्या या कारवाईत 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेले नक्षलवादी जयराम रेड्डी उर्फ चलपतीसह 20 कमांडर मारले गेले आहेत. अजूनही 40 नक्षल कमांडर सुरक्षा दलांच्या घेऱ्यात आहेत.
अनेक राज्यातील सुरक्षा यंत्रणांना अनेक दशके हुलकावणी देणारा प्रताप रेड्डी रामचंद्र रेड्डी उर्फ चलपती (62) हा सुरक्षा यंत्रणाबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. ओडिशाच्या सीमेजवळ छत्तीसगढच्या गरिआबंद जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पात ही चकमक झाली, ज्यामध्ये चलपती याला ठार करण्यात आले आहे. माओवाद्यांच्या रँकमध्ये अत्यंत झपाट्याने वर चढलेल्या चलपतीने अनेक हाय-प्रोफाइल हल्ले घडवून आणले होते, ज्यात एक आमदाराच्या हत्येचे प्रकरणाचा देखील समावेश आहे. (Naxal Chalapati Encounter)
सुरक्षा दलांचे ऑपरेशन किती मोठे आहे?
CRPF, DRG, ओडिशा पोलिस आणि छत्तीसगडच्या E-30 फोर्ससह 5 वेगवेगळ्या सुरक्षा दलांची 10 पथके नक्षलवाद्यांविरुद्धच्या या कारवाईत सहभागी आहेत. या कारवाईसाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. सुरक्षा दलाची टीम आधी ड्रोनच्या माध्यमातून जंगलावर नजर ठेवते आणि नंतर रडारखाली आलेल्या नक्षलवाद्यांना एकामागून मारते. कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी एसपी आणि डीआयजी स्तरावरील अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. (Naxal Chalapati Encounter)
पहाटे चकमक, नक्षलवाद्यांनी घेरले
आतापर्यंत मारले गेलेले बहुतांश माओवादी केंद्रीय समितीचे सदस्य होते. केंद्रीय समिती संपूर्ण भारतातील नक्षल चळवळीचे नेतृत्व करते. त्यामुळेच सुरक्षा दलांचे हे ऑपरेशन या वर्षातील सर्वात मोठे ऑपरेशन म्हटले जात आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर, ओडिशा पोलिस, छत्तीसगड पोलिस आणि कोब्रा बटालियनसह डीआरजीच्या 10 टीम एकाच वेळी सक्रिय झाल्या. रविवारी (19 जानेवारी) पहाटे ही चकमक सुरू झाली. हळूहळू सुरक्षा दलांनी गरियाबंदच्या संपूर्ण जंगलाला वेढा घातला. (Naxal Chalapati Encounter)
सुरक्षा दलाच्या 3 पथकांनी छत्तीसगडला वेढा घातला आणि 7 पथकांनी ओडिशाला वेढा घातला. दरम्यान, नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर दोन्ही बाजूंनी चकमक सुरू आहे. गरियाबंदच्या जंगलातून सोंडूर आणि पायरी नद्यांचा उगम होतो, तेथून नक्षलवादी पळून दुसऱ्या दिशेने जाताच सुरक्षा दलांनी त्यांना ठार मारण्यास सुरुवात केली. मंगळवारी (21 जानेवारी) दुपारपर्यंत सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यातील घेराव 3 किलोमीटरपर्यंत कमी झाला.
या ऑपरेशनमध्ये प्रथमच 2 गोष्टी
- सामान्यत: नक्षलवाद्यांचे राज्य पथक छत्तीसगड आणि गरीबीबंद भागात हालचाली करत असते. चकमकीत राज्य संघाचे सदस्य मारले गेले असले तरी प्रथमच केंद्रीय पथकाचे सदस्य सुरक्षा दलाच्या रडारखाली आले आहेत. आतापर्यंत चकमकीत मारले गेलेले बहुतांश सदस्य केंद्रीय समितीचे सदस्य आहेत.
- याआधीही चकमकी होत आहेत, पण सुरक्षा दलांनी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला आहे. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी गरीबीबंद जंगलात 3-4 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. पोलिस ड्रोनच्या मदतीने येथे गोळीबार करत आहेत. (Naxal Chalapati Encounter)
कोण होता चलपती?
नक्षलवाद्यांची माहिती गोळा करणाऱ्या स्पेशल इंटेलिजन्स ब्युरोने तयार केलेल्या डॉजियरमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, त्याने श्रीकाकुलमच्या उद्दानम भागात काम केले आणि त्याला पक्षाच्या सदस्यावरून विभागीय समिती सदस्य (डीसीएम) बनवण्यात आले होते. रेड्डी याला प्रताप, रवी आणि जयराम अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे.
स्पेशल इंटेलिजन्स ब्यूरोने तयार केलेल्या नक्षलवाद्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेल्या डॉजियरमध्ये सांगण्यात आले आहे की, तो श्रीकाकुलमच्या उड्डानम भागात काम करत होता आणि पक्ष सदस्यपदाहून त्याची बढती डिव्हीजनल कमिटी मेंबर अशी करण्यात आली होती. रेड्डी वेगवेगळ्या नावाने ओळखला जात असे, ज्यामध्ये प्रताप, रवी आणि जयराम अशा नावांचा समावेश आहे. (Naxal Chalapati Encounter)
पत्नीच्या नावाने उघडा PPF खाते, दरमहा मिळेल 1 लाखाहून अधिक उत्पन्न! जाणून घ्या…