Ghodele

Nandkumar Ghodele : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, छत्रपती संभाजीनगर मधील शिलेदार शिंदे गटात जाणार

Nandkumar Ghodele : महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Nandkumar Ghodele : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या 30 वर्षापासून उद्धव ठाकरेंसोबत काम करणाऱ्या शिलेदाराने ठाकरेंची साथ सोडली आहे. छत्रपती संभाजी नगरची माजी महापौर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घोडेले यांनी पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे.

आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं. दरम्यान, असं असतानाच शिवसेना ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. Nandkumar Ghodele

काय म्हणाले नंदकुमार घोडेले
जवळपास 30 वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहोत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मागच्या काळात राज्यात ज्या प्रकारे काम झालं आहे, त्या कामाला प्रभावित होऊन आम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहोत. हिंदुत्ववादी भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडायला नको होती. काँग्रेस पक्षाबरोबर युती केल्यानंतर त्याचा फटका बसला असं मला वाटतं. आता भविष्यात नागरिकांची कामे करायची असतील तर सत्तेबरोबर असणं गरजेचं आहे. या भूमिकेतून आम्ही शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटातील कोणाशीही माझी नाराजी नाही. मात्र, शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर आणखी काम करण्याची संधी मिळेल, अशी प्रतिक्रिया आनंदकुमार घोडेले यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केली. Nandkumar Ghodele

चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर शहरांचं महापौर केलं होतं. मात्र, आता ते स्वार्थासाठी तिकडे गेले आहेत. शिवसेना शिंदे गटात जाऊन त्यांना काय मिळणार? जो मान सन्मान इकडे होता, तो मान सन्मान त्यांना तिकडे मिळणार नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.

Nandkumar Ghodele

जितेंद्र आव्हाडांवर वॉच, पोलीस थेट घरात घुसले

More From Author

Jitendra

Jitendra Awhad: Breaking News – जितेंद्र आव्हाडांवर वॉच, पोलीस थेट घरात घुसले

CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis: देवाभाऊंचे अभिनंदन करण्याची स्पर्धा; विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत