Muslim population India: भारताच्या लोकसंख्येबाबत एक धक्कादायक दावा केला जातोय.
Muslim population India: 2050 पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल, असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार 2050 पर्यंत इंडोनेशियाला मागे टाकून भारत सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश बनेल. सद्यस्थितीत इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे.
या रिपोर्टनुसार 2050 पर्यंत भारतामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ही 31 कोटींवर पोहोचेल. जगभरातील मुस्लिम लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 11 टक्के एवढे असेल. या रिपोर्टनुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल. तसेच हिंदूंची लोकसंख्या वाढून 1 अब्ज होईल. तसेच हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म बनणार आहे. मुस्लीम लोकसंख्येमागे तरुणांचे सरासरी वय आणि उच्च प्रजनन दर, ही कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे. Muslim population India
भारतामध्ये मुस्लिम महिलांची सरासरी 3 मुले आहेत, तर हिंदूंमध्ये ही सरासरी 2 एवढी आहे. तर ख्रिश्चन समाजामध्ये ही सरासरी 2 एवढी आहे. या अहवालानुसार उच्च प्रजनन दरामुळे भारतामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढेल.
2010 मध्ये 14.4 टक्के असलेली मुस्लीम लोकसंख्या 2050 मध्ये वाढून एकूण लोकसंख्येच्या 18.4 टक्के एवढी होईल. मात्र तरीही भारतामध्ये हिंदूंची संख्या ही सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, नायजेरिया आणि बांगलादेशमधील एकूण मुस्लिमांच्या संख्येपेक्षा अधिक असेल. तर भारतामध्ये ख्रिश्चन धर्मियांची एकूण लोकसंख्येमध्ये असलेली 2.5 टक्के संख्या ही घटून 2.3 टक्क्यांपर्यंत खाली येईल, असेही या अहवालात म्हटले आहे. Muslim population India