Mumbai Jan Akrosh Morcha : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत ‘सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.
Mumbai Jan Akrosh Morcha : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज(25 जानेवारी) मुंबईत ‘सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान हा मार्ग ठरवण्यात आला असून या मोर्चाला सर्वपक्षीय नेते तसेच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाईल आणि त्या ठिकाणी सध्या चौकशीची काय परिस्थिती आहे, ती उघड करा यासाठी ही मागणी करणार असल्याचे पुढे आले आहे. तसेच आज या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे देखील सांगण्यात आले आहे. एकंदरीत राज्यातील अनेक भागात निघालेल्या आक्रोश मोर्चानंतर बीड आणि परभणीमधील घटनांची धग आता राज्याच्या राजधानीत पोहचल्याचे चित्र आहे.Mumbai Jan Akrosh Morcha
शासनाला आम्ही वारंवार मागणी केली आहे की, जो फरार आरोपी आहे त्याचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक केली जावी. तसेच जे आरोपी पकडले आहेत त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे प्रकरण असेल किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचे प्रकरण असेल, यात क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. समाजात या घटनांबद्दल आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या लोकभावनेची दखल घेऊन सक्त कारवाई करावी, अशी मागणी या मोर्चातील आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

आजच्या जन आक्रोश मोर्चात शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे, भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, यांच्यासह देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय देखील या मोर्चात सहभागी होणार आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान पर्यंत हा जन आक्रोश मोर्चा असणार आहे. सध्या घडीला शेकडोंच्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे.Mumbai Jan Akrosh Morcha
नैतिकता म्हणून तरी या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा
राज्यात एकीकडे सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला त्यातील आरोपी प्रशासनानं काही तासात शोधून काढला. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील वाल्मीक कराडला शोधण्यासाठी 20 – 20 दिवसांचा अवधी लागला. दुसरीकडे याच प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तो काय देश सोडून गेला असेल का? शासनाच्या नाकर्तेपणामुळेच प्रकरणात दिरंगाई होत आहे. यात पोलीस प्रशासनाचा कुठलाही दोष नाही. नैतिकता म्हणून तरी या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. यात कदाचित उद्या वाल्मीक कराड हे निर्दोष निघाले तर त्यांनी पुन्हा आपले मंत्रीपद स्वीकारावे. अशी मागणी ही मराठा आंदोलकांनी केली आहे.
बहिणीचा आक्रोश ऐका
भावाचा खून होऊन दोन महिने झाले तरी आरोपींना का अटक होत नाही, असा सवाल संतोष देशमुख यांच्या बहिणीने विचारला आहे. या बहिणीचा आक्रोश सरकारला दिसत नाही का, असे त्या म्हणाल्या. वैभवी देशमुख ही इयत्ता 12 मध्ये आहे, लहान मुलगा आहे. लहान भाऊ सलाईन लावल्यानंतर मोर्चात आला आहे. आपली तब्येत ठीक नसते, तरीही सरकार न्याय देण्यासाठी उशीर लावत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.Mumbai Jan Akrosh Morcha
आम्हाला न्याय मिळावा हीच मागणी
आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. जे सराईत आरोपी आहेत. सराईत गुन्हेगार आहेत. या सर्वांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा हीच आमची मुख्य मागणी आहे. आमचे अनेक मोर्चे निघाले. आमचे एकच आव्हान आहे की शांततेत मोर्चे पार पडले पाहिजे आपल्या न्यायच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. यामध्ये कोणी असेल त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले आहेत. ही गुन्हेगारांची गँग आहे. शेवटचा आरोपी संपेपर्यंत आम्ही थांबणार नाही. त्यांना फाशी शिक्षा दिली जावी. या संदर्भात त्यांनी जे तपासणी यंत्रणा राबवलेली आहे तर ते काम करत आहेत आणि आम्ही त्यांच्यावर पण विश्वास ठेवून आहोत की योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.Mumbai Jan Akrosh Morcha
26/11 च्या हल्लेखोराला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, भारताचा अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात मोठा विजय
