Manoj Jarange

Manoj Jarange : धनंजय मुंडे टोळीचा म्होरक्या, मुख्यमंत्री साहेब याला थांबवा; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेंना टोळ्या चालवणारा नेता म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, 22 जानेवारीपर्यंत ही कोठडी असेल. दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव घेत धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा नेता असून त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडे यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. धनंजय मुंडे पांगरीत त्यासाठीच आले. पाप झाकण्यासाठी गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला आहे. ही टोळी रस्त्यावर उतरून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री साहेब याला थांबावा. या टोळीमुळे एकाही गरीबाला त्रास होता कामा नये, अन्यथा आम्हीही सहन करणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. Manoj Jarange Patil

या प्रकरणी न्याय देवता न्याय करणार आहे. आरोपीला तळतळाट लागला आहे. मात्र आरोपी वाचवा म्हणून काही नेत्यांनी फोन केला असणार. परंतु हे सर्व आरोपी आणि यात पाठबळ पुरवणारे सर्व चार्जसीटमध्ये आले पाहिजे. धनंजय मुंडेची टोळी संपली पाहिजे. अंडर ट्रायल केस झाली पाहिजे. जातिवाद आणि दंगली घडवून आणणारी प्रचंड मोठी टोळी धनंजय मुंडे यांची आहे. माननीय न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर एसआयटी आणि सीआयडी कसून तपास करणार आहे. यांनी एकमेकांना व्हिडिओ दाखवले,आनंद व्यक्त केले आहे. धनंजय मुंडेंना आजवर देशमुख कुटुंबाला भेटायला यावे वाटले नाही. मुख्यमंत्री साहेब याला थांबवा. अशा टोळीमुळे त्रास झाला तर आम्ही देखील सहन करणार नाहीत. असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. Manoj Jarange Patil

आता याचा तपास पोलीस, सीआयडी, एसआयटी असा सर्वांचा एकत्रित होणार आहे. त्यांच्या हाती मोठे पुरावेही लागले आहेत. खून झाल्यावर एकमेकांना फोन केले आहेत. त्यांनी व्हिडीओ कॉलही केले. संतोष भय्या ओरडत होते, वेदना सहन करत होते. पण यांना काहीही दया-माया आली नाही. या आरोपींनी सरकारमधील मंत्राला वाचण्यासाठी फोन केले असणार आहेत. यांना साथ देणाऱ्यांनीही फोन केलेले आहेत. हे सर्व चार्जशीटमध्ये यायला हवे. यातील एकही आरोपी सुटता कामा नये. ही मुख्यमंत्रांची जबाबदारी आहे.

या जबाबदारीने त्यांनी राज्याला लागलेला डाग, परळीला लागलेला डाग, धनंजय मुंडेंच्या गुंडांची टोळी आता त्यांच्या जातीलाही मान खाली घालण्याची वेळ आली आहे. यामुळे धनंजय मुंडेंची टोळी संपली पाहिजे. धनंजय मुंडेंची टोळी आहे. माणुसकी त्यांच्यात जिवंत नाही. हा माणूस फक्त पैसे…जात वैगरे काही नको, फक्त पैसे आणि पद पाहिजे. यासाठीच जन्म घेतला. क्रूर आहे हे सर्व, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, एसआयटीची मागणी मान्य

Manoj Jarange Patil

More From Author

Walmik Karad Police Custody

Walmik Karad Police Custody : वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, एसआयटीची मागणी मान्य

Bike Taxi

Bike Taxi in Maharashtra : राज्यभरात पुन्हा बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार; सरकारने बनवला कायदा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत