Manohar Rao

Manohar Rao : काँग्रेसने पीव्ही नरसिंह राव यांच्या अंत्यविधीसाठी ना जमीन दिली ना कधी आदर केला; मनोहर रावांच निर्भिड आरोप

Manohar Rao on Congress : माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे बंधू मनोहर राव यांनी काँग्रेसला दाखवला आरसा.उघड उणिवा

Manohar Rao on Congress : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या समाधीस्थळावरुन नवा वाद सुरू झाला आहे. या वादावरुन माजी पंतप्रधान दिवंगत पीव्ही नरसिंह राव यांचे भाऊ मनोहर राव, यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने 20 वर्षे मागे वळून पाहावे. त्यांनी पीव्ही नरसिंह रावांना किती आदर दिला? काँग्रेसने नरसिंह राव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी जमीन दिली नाही, त्यांचा एक पुतळाही कधी बांधला नाही, त्यांना भारतरत्नही दिला नाही, अशी टीका त्यांनी केली.

मनोहर राव पुढे म्हणाले, काँग्रेसने तर नरसिंह राव यांचे पार्थिव ठेवण्यासाठी पक्षाचे दिल्लीतील कार्यालयाचे कुलूपही उघडले नव्हते. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. मात्र नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही आले नाही. सोनिया गांधी एआयसीसीच्या अध्यक्षा होत्या, त्या येऊ शकत होत्या, मात्र त्या हैदराबादला आल्या नाही, अशी टीका त्यांनी केली.

डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या कार्यकाळात खूप प्रसिद्धी मिळाली, कारण नरसिंह राव यांनी त्यांना अर्थमंत्री म्हणून काम करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. या काळात मनमोहन सिंग यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. देशाला आर्थिक संकटातून वाचवले. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची जोडी गुरु-शिष्याची जोडी होती. पण, मनमोहन सरकारमध्ये नरसिंह राव यांना काय मिळाले? मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी भाजप नक्कीच जमीन देईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Manohar Rao on Congress

भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांची मुक्ताफळे

सौजन्य-एएनआय

More From Author

Pranab Mukherjee Daughter

Pranab Mukherjee Daughter:काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त झालाय, प्रणव मुखर्जींच्या मुलीने साधला निशाणा…

sai baba

Sai Baba: सलग 14 व्या वर्षी श्री Sai Baba मंदिर शरणापूर येथून पालखी सह पदयात्रा शिर्डी कडे प्रस्थान!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत