Manmohan Singh Passes Away

Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manmohan Singh Death : दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्या वर्षीय दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांना श्वसनास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले. आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्देवी बातमी समोर आली आहे. Manmohan Singh Death

मनमोहन सिंग यांचा अल्प परिचय
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.

पंतप्रधान मोदींकडून फोनवरुन विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच अनेक दिग्गज नेते एम्स रुग्णालयात दाखल होत आहे. पोलिसांकडून आता दिल्लीतील एम्स रुग्णालयाचा परिसर मोकळा करण्याचं काम सुरु झालं आहे. काँग्रेसनेही त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

आता गुलाल भाजपचाच; दिल्ली काबीज करण्यासाठी RSS ने आखली रणनीती…

Manmohan Singh Death

More From Author

Delhi Election 2024

Delhi Election 2024: आता गुलाल भाजपचाच; दिल्ली काबीज करण्यासाठी RSS ने आखली रणनीती…

Gautam Adani

Gautam Adani : आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करतो, गौतम अदानींनी खोडून काढले काँग्रेसचे आरोप

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत