Maharashtra ST : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Maharashtra ST : महाराष्ट्र एसटी महामंडळाची अवस्था खूप बिकट आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील एसटी बसेस खूप खराब परिस्थितीत आहेत. पण, आता लवकरच एसटी महामंडळाचा कायापालट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5 हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतला.
परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्या सह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, नवीन बस खरेदीचा करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा. याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी. (Maharashtra ST)
तसेच, एसटी महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्याने उभारण्यात यावे. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात. कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी. पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये. शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
ते पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाने नवीन जाहिरात धोरण आणावे. नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस अशा तीनही बाजूला डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी. जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून यामधून मिळणारे उत्पन्न 100 कोटीपर्यंत आणण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात यावे. महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल माफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा तसेच डिझेलवरील व्हॅटमध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले. (Maharashtra ST)
नो पार्किंग-नो कार…, महाराष्ट्रात कडक नियम लागू करण्याची तयारी
मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सीसोबतच महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये बाइक टॅक्सी चालवण्याच्या तयारीत असलेल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सरनाईक म्हणाले की, दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे. सरनाईक म्हणाले की, 1 बीएचके घरात राहणारे लोक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याचे समोर आले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, महाराष्ट्र सरकार एक नवीन धोरण लागू करण्याचा विचार करत आहे, ज्या अंतर्गत लोकांना त्यांची कार खरेदी करण्यापूर्वी त्यांची तपासणी करणे आवश्यक असेल.
गरीब लोकांनी गाड्या खरेदी करू नयेत
सरनाईक म्हणाले, ज्यांच्याकडे खासगी पार्किंगची सुविधा नाही ते सार्वजनिक पार्किंगमध्ये जागा सुरक्षित करून कार खरेदी करू शकतात. गरीब लोक कार खरेदी करू शकत नाहीत, परंतु त्यांना पार्किंगची व्यवस्था करावी लागेल. काही लोक या निर्णयाचे कौतुक करतील, असे सरनाईक म्हणाले. सरनाईक म्हणाले की, कर्जावर खरेदी केलेल्या एक बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक त्यांच्या कार सार्वजनिक रस्त्यावर पार्क करत आहेत कारण त्यांच्याकडे खाजगी पार्किंगची सुविधा नाही. सार्वजनिक ठिकाणी वाहनांच्या अनियंत्रित पार्किंगमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. (Maharashtra ST)
वाहतूक समस्या सोडवणे आवश्यक आहे
सरनाईक म्हणाले की यात रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल सारख्या आपत्कालीन सेवांमध्ये व्यत्यय देखील समाविष्ट आहे. सोसायट्यांमधील मोकळ्या जागांचा वापर पार्किंगसाठी केला जातो, ज्यामुळे आपत्कालीन सेवा सुरू करण्यात अडथळा येतो. मात्र, हे धोरण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विरोधात नसून वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सरनाईक परिवहन मंत्री झाले तेव्हापासून ते वाहतूककोंडी कमी करण्याचा अजेंडा घेऊन पुढे जात आहेत. त्याअंतर्गत त्यांनी केबल टॅक्सीचा प्रकल्प पुढे रेटला आहे. यासह राज्यभरात बाईक टॅक्सींचे नियम लागू करण्याची तयारी सुरू आहे.
(Maharashtra ST)