Maharashtra politics

Maharashtra politics: राज्यात महायुतीच सरकार कोसळणार, 5 मोठ्या घडामोडी

Maharashtra Politics : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरकारने दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक म्हणजेच 132 जागा मिळविल्यात तर शिंदेंच्या सेनेने 57 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवर विजय मिळवला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याने विविध स्तरावरील नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर वार पलटवार करताना दिसत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार उत्तमराव जानकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जानकरांनी?

तीन महिन्यात राज्यातलं सरकार  हे निश्चित पडेल, त्याचे पुरावे मी सादर केल्यानंतर देश गडबडून जाईल. सरकार शंभर टक्के जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्यावा लागणार’ असा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. एवढच नव्हे तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर पुन्हा घेऊन दाखवा.अजित पवार दहा हजार मतांनी पराभूत होतीलच.शिवाय रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे आव्हानही आपण स्विकारतो देशाची आणि राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याच वक्तव्य असं जानकर यांनी केलं आहे.

FDI in Maharashtra :परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली आकडेवारी

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणालेत की, सरकार आणि वाल्मिक कराड यांच्या मध्ये देखील अनेक तडजोडी झाल्या आहेत. त्यामुळे तीन आरोपी फरार आहेत. आरोपी वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक करणे अपेक्षित होत, मात्र तो हजर झाला ही पोलिसांसाठी मोठी नामुष्कीची गोष्ट आहे.

आकाच्या मागे कोण आहे?

हे गृह विभागाने शोधून काढावे, जर त्यांना सापडत नसेल तर गृह खातं माझ्याकडे द्या, मी सगळं शोधून काढतो असंही विधान  जानकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना तोंड फूटल आहे.

https://boltevha.com/maharashtra-mr/fdi-in-maharashtra-cm-3/

Follow us on Facebook

More From Author

Santosh Deshmukh Incident

Santosh Deshmukh Incident: वाल्मिक कराड अडचणीत, सहकाऱ्याने पोलिसांसमोर कबूल केला 5 गुन्हे

Jitendra

Jitendra Awhad: Breaking News – जितेंद्र आव्हाडांवर वॉच, पोलीस थेट घरात घुसले

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत