Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अनपेक्षित, अनाकलनीय!

Maharashtra Politics : विधानसभेबरोबरच अनेक अपयश पचवून धक्के पचवून काँग्रेस आता नव्याने तयारीला लागली असल्याचं चित्र आहे.

लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीने गाजवली तर विधानसभा निवडणुकीत महायुतीने आघाडीला पाणी पाजलं. अर्थातच यात सर्वात जास्त धुव्वा उडाला तो काँग्रेसचा! ढिसाळ नियोजन, लोकसभा निवडणुकीचा डोक्यात गेलेला विजय अन् नको तितकं ताणून धरणं काँग्रेससाठी पराभवाचं कारण ठरलं .(Maharashtra Politics)

Maharashtra Politics : त्यात अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव काँग्रेसला पचवावा लागला. हे सर्व धक्के पचवून काँग्रेस आता नव्याने तयारीला लागली असल्याचं चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा जोर धरताना दिसून येत आहे. चला तर मग जाणून घेऊन कोण होणार महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष..!

Maharashtra Politics :नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पदासाठी अनेक नवीन चेहऱ्यांची चर्चा सुरू असून आमदार अमित देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील, आणि यशोमती ठाकूर यांच्या नावांचा समावेश आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चार वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं होतं, पण विधानसभेत पक्षाला मोठा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे नाना पटोले यांना हटवून नवीन चेहरा देण्याची मागणी पक्षातून होत आहे.

विश्वजित कदम यांनी काँग्रेसला सांगलीमध्ये उभारी देत लोकसभेत नवा प्रयोग यशस्वी करून दाखवला. आक्रमक परंतु समंजस आणि सुस्वभावी असा विश्वजित कदम यांचा चेहरा असून त्याचा आक्रमकपणा काँग्रेसला उभारी देऊ शकतो असा विश्वास कदम समर्थकांना असून प्रदेशाध्यक्ष पदावर कदमांचीच निवड व्हायला हवी असा आग्रह त्यांचा आहे.

दुसरीकडे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला सुगीचे दिवस प्राप्त करून देणारे सतेज पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी धडाडीचे आणि आक्रमक नेते ठरतील अशा विश्वास काँग्रेसमधीलच एक गटाने मांडल्याचं आमच्या खास सूत्रांकडून समजलं आहे.

सतेज पाटील यांनी कोल्हापूरचं नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तळागाळात आणि ग्रामीण भागात काँग्रेसची नाळ पक्की केली. ग्रामीण भागात त्यांना लोकं प्रेमानं बंटी म्हणून बोलावतात. जनसामान्यांमधला नेता म्हणून सतेज पाटील यांची ख्याती आहे. येणारा काळच ठरवेल की बंटी उर्फ सतेज पाटलांचा आक्रमकपणा काँग्रेससाठी किती फायद्याचा ठरेल? यात आणखी एक नाव जोर धरत असून विदर्भातील एकमेव महिला फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून त्यांच्या परिचय संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

यशोमती ठाकूर यांनी संपूर्ण विदर्भात काँग्रेससाठी भरीव काम करत विदर्भाला काँग्रेसचा गड म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. त्यातच लोकसभा निवडणुकीत एकट्या यशोमती ठाकूर यांनी विदर्भात भाजपसह महायुतीचं पानिपत केलं. त्यांचा आक्रमकपणा भाजपसाठी अमरावती जिल्ह्यात डोकेदुखी ठरला आहे. त्यांच्या भूमिकेने काँग्रेसला राज्यभरात नवसंजीवनी मिळेल आणि काँग्रेसला हवं ते यश मिळू शकेल असा विश्वास विदर्भातील काँग्रेसला आहे.

तर अमित देशमुख हे तरुण आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं मार्गदर्शन लाभलेले अमित देशमुख पक्षातील शांत, संयमी आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला आले आहेत.

त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात असल्याची चर्चा जोर धरून आहे. आता अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत किती यश मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महाराष्ट्र काँग्रेससमोर अनेक प्रश्न आहेत. त्यांचा सामना करण्याचं ध्येय बाळगणारा आणि काँग्रेसला नवचैतन्य प्राप्त करून देणारा प्रदेशाध्यक्ष मिळणं काँग्रेससाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. Maharashtra Politics :

https://www.tv9marathi.com/maharashtra/state-president-of-congress-will-change-the-name-of-the-former-chief-minister-will-be-discussed-1333668.html

January 1, 2019

Timeline Heading 1

This is timeline description. Please click here to change this description.

January 1, 2019
January 1, 2019

Timeline Heading 2

This is timeline description. Please click here to change this description.

January 1, 2019
January 1, 2019

Timeline Heading 3

This is timeline description. Please click here to change this description.

January 1, 2019
January 1, 2019

Timeline Heading 4

This is timeline description. Please click here to change this description.

January 1, 2019
January 1, 2019

Timeline Heading 5

This is timeline description. Please click here to change this description.

January 1, 2019

Naxal Encounter : विजापूरच्या घटनेचा 10 दिवसांत घेतला बदला, सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणात कोर्टाने सुनावली 14 वर्षांची शिक्षा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत