Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : अजमेर शरीफ दर्गा वाद चर्चेत; उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर

Uddhav Thackeray : ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा 813 वा उरुस लवकरच सुरू होणार आहे.

Uddhav Thackeray : मागील काही दिवसांपासून अजमेर दर्गा शरीफ चर्चेत आहे. या दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला असून, याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशातच, ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा 813 वा उरुस लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चादर पाठवली आहे. त्यांनी मंगळवारी (24 डिसेंबर) खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे सादर चढवण्यासाठी सुपूर्द केली. Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ही चादर जिशान चिश्तीकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, मुझफ्फर पावसकर, कमलेश नवले, नौमन पावसकर, उपशाखाप्रमुख गणेश माने आदी उपस्थित होते. दरम्यान, अजमेर दर्ग्याच्या खाली शिवमंदिर असल्याच्या दाव्याबाबत न्यायालयात खटला सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी ही सादर पाठवली आहे. अशा परिस्थितीत ठाकरे यांनी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यासाठी चादर पाठवल्याचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात. Uddhav Thackeray

राजस्थानच्या अजमेर दर्ग्यामध्ये मंदिर असल्याच्या दाव्यावर शुक्रवारी (20 डिसेंबर) दिवाणी न्यायालयात दुसऱ्यांदा सुनावणी झाली. याचिकाकर्ते आणि इतर पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील निर्णयाची तारीख 24 जानेवारी दिली आहे. अजमेर दिवाणी न्यायालयाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, दर्गा समिती अजमेर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांना नोटीस पाठवली होती.

Uddhav Thackeray

https://boltevha.com/icc-champions-trophy-2025/

More From Author

ICC Champions Trophy

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK सामना कुठे होणार, पाहा…

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत