Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडला आज बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Santosh Deshmukh Murder Case : पवनचक्की खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकणात वाल्मिक कराडला (Walmik Karad) आज बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी केज न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली आहे. त्यानंतर आज केज न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच 14 दिवसांची न्यायालयीने कोठडी देण्यात आली आहे.
कोर्टात काय झाले?
आज केवळ खंडणी प्रकरणात दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. कुठे ही तपासात वाल्मिक कराड यांचा कुठलाही सहभाग नाही असा युक्तीवाद कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. त्यांच्यावर मकोका लावण्याचा कोणताही युक्तीवाद झाला नसल्याची माहिती ॲड ठोंबरे यांनी दिली. आज कोर्टापुढे युक्तीवाद झाला. त्यांनी 10 मुद्द्यावर पोलीस कोठडी मागितली. 10 दिवसाची कोठडी मागितली होती.
त्या आधीच्या वेळीही पोलीस कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयीन कोठडी लावण्यात आली आहे. आम्ही जामिनाचा अर्ज केला आहे. दोन चार दिवसात सुनावणी होणार आहे. मकोकाची प्रक्रिया वेगळी आहे. सरकारी वकिलाचे नवीन मुद्दे काही नव्हते. त्यांनी कुठे कुठे मालमत्ता घेतली, ॲट्रोसिटी वगैरे मुद्दे मांडले. त्यांनी अनेक मुद्दे मांडले. पण कोर्टाने सर्व मुद्दे ग्राह्य धरले नाही, असे ॲड. ठोंबरे यांनी सांगितले. Santosh Deshmukh Murder Case
सीआयडी लिंक तपासणार?
वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहे. त्यामुळे संतोष देशमुख मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास सीआयडीला करायचा आहे. आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितले जात आहे. वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा तपास करायचा आहे, असं एसआयटीने कोर्टात म्हटलं आहे. त्यामुळे आता कोर्ट का निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
परळी बंदची हाक
वाल्मिक कराड याला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सकाळपासूनच तीव्र आंदोलन केले होते. समर्थक आता आक्रमक झाले आहे. त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. आज वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा पोलीस ठाण्याबाहेर त्यांना सोडवे यासाठी ठिय्या आंदोलन केले. शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं बंद करण्यात आली आहे. परळीचे सर्व व्यवहार हे ठप्प झाले आहेत. Santosh Deshmukh Murder Case
जापानच्या क्यूसूमध्ये 6.9 तीव्रतेचा भीषण भूकंप, त्सुनामी अलर्ट जारी