Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या खाजगी निवासस्थानी पोलीस घुसले, आव्हडांनी पकडून ठेवले, थेट वरिष्ठांना लावला फोन
Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस खात्याचा एक व्यक्ती त्याचे गोपनीय पद्धतीने शुटींग करत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेवर गोपनीय विभागातील पोलिसांचे लक्ष आहे का, सरकारने त्यांना अशारितीने पाठवले आहे का, असा सवाल उपस्थित करत आमदार आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या घरातच ठेऊन घेतले आहे. Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना ठाण्याच्या एसबीचे (गोपनीय विभाग) पोलीस शूटिंग करत होते. त्यावरुन, पत्रकार परिषद सुरू असताना आव्हाड भडकले. तसेच, विरोधी पक्षातील नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे? सरकारला नक्की वॉच ठेवून काय करायचे आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती आव्हाड यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या वरिष्ठांना फोनद्वारे केली. Jitendra Awhad
तसेच, आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला मी घरातच ठेऊन घेत आहे, जोपर्यंत तुमचे वरिष्ठ अधिकारी इथं येऊन याबाबत खुलासा करत नाहीत, तोपर्यंत मी त्यांना सोडणार नाही. मग, रात्र झाली तरी चालेल, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना दम भरला.
नेमकं काय आहे प्रकरण?
जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय विभागाचे पोलीस तिथे पोहोचले, ही पत्रकार परिषद आव्हाड यांच्या घरात सुरू होती. पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे. यावरून आता आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात का घुसले? सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.Jitendra Awhad