Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
Devendra Fadnavis : आज राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने सर्व मंत्री (Ministers) आज मुंबईत मंत्रालयात आले होते. प्रत्येक मंत्री हे त्यांच्या खात्याचे मंत्री असले तरी ते त्यांच्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी देखील आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघाचीदेखील कामे करणे अनिवार्य आहे. त्यामुळे मंत्र्यांकडून आपल्या मतदारसंघांचा विकासासह राज्यातील विकासकामांकडेही लक्ष द्यावे लागते. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी आपल्या मंत्र्यांना अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत.
आता दर आठवड्यात किमान तीन दिवस मुंबईत थांबा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना दिल्या आहेत. लोकांच्या कामासाठी आठवड्यात किमान तीन दिवस मंत्रालयात भेटा. उरलेल्या दिवसांत मतदारसंघातील कामांचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या मंत्र्यांना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या गतिमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या मंत्र्यांना हे आदेश दिले आहेत. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :
शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-२०१४ मध्ये सुधारणा करणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)
- १ एप्रिल २०२५ पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य
महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करणार (सामान्य प्रशासन विभाग)
- शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल
- मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणे, मा. राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती इत्यादी बाबींसंदर्भात तरतुदी (Devendra Fadnavis)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, 5 फेब्रुवारीला मतदान अन् 8 ला निकाल