Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : CM देवेंद्र फडणवीस बीडचे पालकमंत्री होणार? दिले सूचक विधान; म्हणाले…

Devendra Fadnavis : मंत्रीपदे आणि खातेवाटपासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच रस्सीखेच आता पालकमंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहे. 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचे पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यातील पालकमंत्रीपदासाठी जोरदार फील्डिंग लावल्याचे दिसत आहे. अशातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालकमंत्रीपदाबाबत महत्वाचे भाष्य केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याबाबतचा निर्णय घेतील. चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. (Devendra Fadnavis Guardian Minister)

मंत्रीपदे आणि खातेवाटपासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच रस्सीखेच आता पालकमंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहे. 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे, रायगड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याचे महायुतीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अशातच, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे अंतिम निर्णय घेतील. त्यांनी मला बीडला पाठवले तरी मी बीडला जाईन. पण माझ्या मते साधारणपणे मुख्यमंत्री स्वत:कडे कोणते पालकमंत्रीपद ठेवत नाहीत. असे असले तरी माझी इच्छा अशी आहे की, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावे. त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी असेल तर ते होईल. अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis guardian minister)

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेल्या भरघोस यशानंतर एका महिन्याने राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपासह आकाराला आले. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे महायुतीतील सूत्रांनी सांगितले. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे.

(Devendra Fadnavis guardian minister)

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सौजन्य-TV9Marathi, SaamTVNews, News18Lokmat

More From Author

Gautam Adani

Gautam Adani : आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करतो, गौतम अदानींनी खोडून काढले काँग्रेसचे आरोप

Suresh Dhas on Dhananjay Munde

Suresh Dhas on Dhananjay Munde : महादेव बेटिंग अॅप, एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचे व्यवहार; सुरेश धसांचे खळबळजनक आरोप

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत