CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis : वाल्मिक कराड, धनंजय मुंडे अन्…मुख्यमंत्री Devendra Fadnavis थेट बोलले

CM Devendra Fadnavis on Walmik Karad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर महत्वाची प्रतिक्रिया दिली.

CM Devendra Fadnavis on Walmik Karad: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.

मला या प्रकरणातील राजकारणामध्ये जायचं नाही. मी पहिल्यापासून सांगतोय, कुणाही विरोधात पुरावा असेल, तर द्या. ज्याच्या विरोधात पुरावा असेल… आम्ही शोधतोय, दुसऱ्या कोणाजवळ असेल, तर त्यानेही द्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. तसेच, माझ्या करिता संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. मला कोणत्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचे नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा. तो आम्ही मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी मांडली. CM Devendra Fadnavis on Walmik Karad

वाल्मिक कराडवर काय म्हणाले
कोणालाही अशा प्रकारची हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे. त्यामुळेच आज वाल्मिक कराडला त्याठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतील जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम या कामाला लागल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. सगळ्यांना शोधून काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. CM Devendra Fadnavis on Walmik Karad

वाल्मीक कराडचे आत्मसमर्पण, आता पुढे काय?
पुण्यात सीआयडीच्या अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज सकाळी साडेबाराच्या दरम्यान, केज पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी वाल्मिक कराड, हा स्वतःहून सीआयडीच्या मुख्यालयात हजर झालेला आहे. त्याला पुणे सीआयडीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून आम्ही त्याला आमच्या टीमसह तपास पथकाचे बीड सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यासाठी त्यांना रवाना केलेले आहे. पुढे जे सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक आहेत, ते या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्यांच्या ताब्यात फरार आरोपीला देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. CM Devendra Fadnavis on Walmik Karad

संभाजीराजेंचा हल्लाबोल
संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा कराड शरण आल्याच्या प्रकरणावरून आमदार धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. संभाजीराजे म्हणाले, कराडची शरणागती हे सी आय डी चे यश नाही. थोडं फार सरकारवर जो आम्ही दबाव टाकला होता, त्यातून हा मानसिक दबाव वाल्मीक कराड वर आला असेल. 22 दिवस आरोपी बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो. अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतो, पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल होतो.

काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मीक कराड हजर होतो, हा संशोधनाचा भाग आहे. वाल्मीक कराड 7 आरोपींचा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने 14 गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा बॉडी गार्ड घेऊन फिरतो. वाल्मीक कराड यांच्यावर मोक्का लागणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद दिलं तर मुळीच देऊ नका. वाल्मीक कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही.

 New Year चे जल्लोषात स्वागत; सर्वप्रथम ‘New Zealand’ मध्ये उगवला नववर्षाचा पहिला सूर्य…

सौजन्य-TV9Marathi,MumbaiTak,sakal

More From Author

Welcome 2025

Welcome 2025 : New Year चे जल्लोषात स्वागत; सर्वप्रथम ‘New Zealand’ मध्ये उगवला नववर्षाचा पहिला सूर्य…

Farmer News

Farmer News: नवीन वर्षात शेतकऱ्यांना बसणार मोठा झटका, डीएपीची किंमत वाढणार

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत