Anjali Damania : वंजारी समाजाचा मुंडे कुटुंबाकडून वापर केला जात आहे, असा हल्लाबोल अंजली दमानिया यांनी केला आहे.
Anjali Damania on Santosh Deshmukh Case : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी बीडमध्ये तळ ठोकला असून, तेथील अनेक अनियमित कामांसंदर्भात आवाज उठवला आहे. बीडमधील शासकीय कार्यालयात अनेक वरिष्ठ पदावर परळीतील वंजारी समाजातील लोक असल्याचा दावा त्यांनी काही पुराव्यांआधारे केला होता. यावरून आता अंजली दमानिया यांना वंजारी समाजाकडून रोष पत्कारावा लागत आहे. पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले.
पत्रकार परिषदेत अंजली जमानिया म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी मी माध्यमांशी बोलताना काही विधाने केली होती. बीडच्या वरिष्ठ पदावर सर्व वंजारी समाजाची लोक आहेत, असे मला अभ्यासातून समजले होते. वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रशासनात घेण्यात आले होते. काही काळाने त्या सर्वांना बीडमध्ये बोलावण्यात आले. हे विधान कुठेही समाजाविरोधात बोलले नव्हते. (Anjali Damania on Santosh Deshmukh Case)
यावेळी अंजली दमानिया यांनी आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंडे बहीण-भावाकडून वंजारी समाजाचा वापर होत आहे. मुद्दा हा आहे की मी कधीही कोणत्याही समाजाविरोधात बोलत नसेन तर मी जर आता बोलले तर ते का बोलले? मी ट्वीटरवर दोन ट्विट्सही टाकले. भगवान बाबांसारखे संत होते, ते शैक्षिणिक, सांस्कृतिक प्रबोधन करायचे, ते नेहमी वंदनीय आहेत, मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे असं एका चकार शब्दाने म्हटले नाही. पण त्यातील माझा उल्लेख काढून काही लोकांनी समाजातील सर्व लोकांना पाठवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले. त्यामुळे मला आता सातत्याने फोन येत आहेत. मी अभ्यासपूर्वक बोलले होते. उच्च पदावरील माणसं फक्त परळीमधील का? असा माझा सवाल होता.
नरेंद्र सांगळेचा काही वेळापूर्वी मला फोन आला होता. हा माणूस उठसूठ फोन करत सुटलाय. त्यांनी माझा फोननंबर फेसबूकवर टाकलाय. काही पोस्ट केल्या असून खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर ते समर्थक असल्याचे दिसतेय. माझ्याविरोधात त्यांनी अश्लील कॉमेंट्स करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी 700 ते 800 फोन आले. आज चौथा दिवस आहे. मी मॉरिशअसला स्कुबा डायविंगला गेले होते. त्यातील एक फोटो फेसबूकवर टाकून अश्लील कमेंट्स केली. हे सर्व धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. (Anjali Damania on Santosh Deshmukh Case)
आकाच्या मर्जीतला अधिकारी एसआयटीत?
अंजली दमानिया यांनी या तपासावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने कसे? असा सवाल त्यांनी केला. बीड जिल्ह्यातील पोलिसांना एसआयटीत घेतले तर ते कसे चौकशी करतील? ही पोलीस वाल्मिक कराडला नमस्कार करणारी माणसे आहेक. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी बाहेरील अधिकारी नेमावी अशी मागणी त्यांनी केली. ह्या शासनाचे डोके ठिकाण्यावर आहे का? बीड अधिकारी बीड च्या boss ची निष्पक्ष चौकशी करणार का असा सवाल त्यांनी केला. तसेच, बीड जिल्ह्यात शासनाकडून जारी करण्यात आलेल्या बिंदू नामावली प्रमाणे अधिकाऱ्यांच्या नेमणुका होत नाहीत, असाही आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. (Anjali Damania on Santosh Deshmukh Case)
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडनुक काळात धंनंजय मुंडे चा कार्यकर्ता आसल्याप्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा आत्यंत खास माणुस आसुन गेले 10 वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
सौजन्य-एबीपीमाझा, मटा
जितेंद्र आव्हाडांवर वॉच, पोलीस थेट घरात घुसले
(Anjali Damania on Santosh Deshmukh Case)