Jammu Kashmir Blast

Jammu Kashmir Blast : जम्मू-काश्मीरच्या नौशेरात बॉम्ब ब्लास्ट, 6 जवान जखमी

Jammu Kashmir Blast : जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jammu Kashmir Blast : जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे भूसुरुंग स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील भवानी सेक्टरमधील मकडी भागात स्फोट झाला, ज्यामध्ये लष्कराचे 6 जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी 9 डिसेंबर 2024 रोजी जम्मूच्या पुंछमध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. 25 राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार व्ही. सुब्बय्या वारीकुंटा यांचा पूंछमधील ठाणेदार टेकरी येथे गस्तीवर असताना भूसुरुंगाच्या स्फोटात मृत्यू झाला, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. लष्कराने सांगितले की, त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबाप्रती तीव्र संवेदना आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. (Jammu Kashmir Blast)

दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टणमधील पल्हालन भागात एक आयईडी निकामी करण्यात आला. अधिका-यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना पट्टणच्या पल्हल्लनमध्ये आयईडी सापडला. घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक (बीडीएस) पाठवण्यात आले आणि आयईडी निकामी करण्यात आला.

ऑक्टोबर 2024 मध्येही कुपवाडा येथे सुरंग स्फोट झाला होता, ज्यामध्ये लष्कराचे दोन जवान जखमी झाले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्रेहगाममधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पहाटे तीनच्या सुमारास स्फोट झाला, जेव्हा सैनिक या भागात गस्त घालत होते. या स्फोटात लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Jammu Kashmir Blast)

ड्युटीवर निघालेल्या PSI चा नायलॉन मांजाने चिरला गळा, प्रकृती गंभीर; सातारा परिसरातील घटना

More From Author

Nylon Manja

Nylon Manja Accident : ड्युटीवर निघालेल्या PSI चा नायलॉन मांजाने चिरला गळा, प्रकृती गंभीर; सातारा परिसरातील घटना

Delhi School Bomb

Delhi School Bomb Threat: दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; दहशतवादी कनेक्शन?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत