Jairam Ramesh

Jairam Ramesh : भाजप नेते Manmohan Singh यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांची मुक्ताफळे

Jairam Ramesh On Dr. Manmohan Singh: काँग्रेस नेते जयराम रमेश, यांच्या दाव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Jairam Ramesh On Dr. Manmohan singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले, तर शनिवारी त्यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर आता त्यांच्या समाधी स्थळावरुन नवा वाद पेटला आहे. भाजपने मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच, आता काँग्रेस सचिव जयराम रमेश यांनी तर एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानेही नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

एएनआयशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, 2004 मध्ये मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले, त्यावेळी भाजप नेते त्यांच्याशी नीट बोलले नव्हते. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होतील, अशी भाजप नेत्यांना अपेक्षा नव्हती. लालकृष्ण अडवाणींसह भाजपचे इतर नेते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटायला यायचे, तेव्हा त्यांच्यासमोर फायली फेकायचे, असा दावा त्यांनी केला आहे. (Jairam Ramesh On Dr. Manmohan singh)

ते पुढे म्हणाले, भाजपचे नेते आज मनमोहन सिंग यांची स्तुती करत आहेत, पण त्यांनी आधी मनमोहन सिंग यांचे व्यक्तिमत्त्व पहावे. त्यांच्या नोटाबंदीवरील भाषणाने सरकार हादरले होते. लाला बहादूर शास्त्री यांच्याबद्दल सांगितले जाते की, ते अजातशत्रू होते. मी डॉ. मनमोहन सिंग यांचे वर्णनदेखील तसेच करेन, असंही जयराम रमेश म्हणाले.

काँग्रेसचा भाजपवर आरोप
मनमोहन सिंग 10 वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे आजही गरीब व मागासवर्गीयांना मोठे बळ मिळते. आजवर सर्व माजी पंतप्रधानांचे अंतिम संस्कार विशिष्ट स्थळी करण्यात आले. मात्र मनमोहनसिंग यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी भाजपप्रणीत सरकारने वेगळी भूमिका घेतली. स्मारक बांधता येईल अशी जागा न निवडता निगमबोध घाटावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय भाजपप्रणीत केंद्र सरकारने घेतला. या सरकारने देशाच्या थोर सुपुत्राचा व पहिल्या शीख पंतप्रधानांचा घोर अपमान केला,” असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला. (Jairam Ramesh On Dr. Manmohan singh)

विनाकारण वाद वाढवला
अंत्यसंस्कार आणि स्मारकावरून केंद्र सरकारने विनाकारण वाद वाढवल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत यांनी केला. ते म्हणाले की, 2012 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकारने मुंबईच्या शिवाजी पार्कवर विशेष जागा निश्चित करून ठाकरेंचे अंत्यसंस्कार केले. काँग्रेसने सदैव सर्व पक्षांच्या नेत्यांना सन्मानजनक निरोप दिला. मात्र, भाजपने मनमोहन सिंग यांच्यासंदर्भात जे वर्तन केले ते अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका त्यांनी केली.

नाना पटोलेंची टीका
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग हे शेवटच्या माणसापर्यंत विकास कसा पोहचेल याचा विचार करत, आपल्या 10 वर्षांच्या काळात त्यांनी देशाला मनरेगा, शिक्षण हक्क, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार कायदा देऊन सर्वसामान्यांचे हितच पाहिले. जगात कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढले असताना त्याची झळ सामान्यांना बसणार नाही यासाठी योग्य नियोजन केले. डॉ. मनमोहन सिंग यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व जगाने पाहिले, जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख त्यांच्याकडे आदराने पहात, त्यांचा सन्मान करत अशा महान व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सत्ताधारी पक्षाने राजघाटावर जागा दिली नाही. ज्या व्यक्तीने कधीच भेदभाव केला नाही त्यांच्याबाबतीत सत्ताधारी पक्षाने केलेला भेदभाव चुकीचा असून राजघाटावर जागा न देऊन भाजपाने गलिच्छ राजकारण केले आहे, असे पटोले म्हणाले.

(Jairam Ramesh On Dr. Manmohan singh)

14 दिवस साखर सोडल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे…

सौजन्य-न्यूज24, एनडीटीव्ही

More From Author

Ramayana

Ramayana Sahasranana Story: कोण होता 1000 डोक्यांचा ‘सहस्त्रानन’? रावण वधानंतर भगवान रामाशी केले युद्ध

Amit Shah on Farmers

Amit Shah on Farmers: शेतकऱ्यांबाबत अमित शहांची मोठी तयारी, आता MSP व्यतिरिक्त मिळणार मोठा नफा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत