Israel Hamas Ceasefire: हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करण्यास सुरुवात केली आहे.
Israel Hamas Ceasefire: अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात आज एक मोठे वळ आले. अमेरिकेच्या सांगण्यानंतर आज अखेर इस्रायलने हमासोबतच्या युद्धबंदी जाहीर केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही युद्धबंदी जाहीर केली आहे. यामुळे आता मिडल ईस्टला 15 महिन्यांनी शांतता अनुभवता येणार आहे. ही युद्धबंदी अटीची असून दोन्ही बाजुने एकमेकांना अटी घालण्यात आल्या आहेत.
हमासने इस्रायलवर हल्ला करून शेकडो लोकांना ओलीस केले होते. यानंतर इस्रायलने युद्ध छेडले होते. हमासच्या प्रमुखांना संपविण्यात आले असून भारतासह अनेक देशांनी हे युद्ध थांबावे असे आवाहन केले होते. अमेरिका इस्रायलला शस्त्रास्त्रांसाठी मदत करत होती. अखेरीस अमेरिकेत नवीन सरकार येत असल्याने ते सत्तेत बसण्यापूर्वीच ही युद्धबंदी लागू झाली आहे. हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी आज 3 जणांना सोडण्यात येणार आहे. (Israel Hamas Ceasefire)

गेल्या 8 महिन्यांपासून युद्धबंदी करण्याचे प्रयत्न केले जात होते. परंतू इस्रायल काही केल्या ऐकायला तयार नव्हता. या युद्धात गाझा पट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो इमारती नेस्तनाभूत झाल्या आहेत. आता तिथे पुन्हा नवीन घरे, इमारती, पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यासाठी लाखो कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी संयुक्त राष्ट्रे महत्वाची भूमिका निभावणार आहेत.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दुटप्पी भूमिका घेतली होती. ते एकीकडे युद्धाला मदतही करत होते, दुसरीकडे युद्ध थांबविण्याचाही प्रयत्न करत होते. आता 20 जानेवारीला अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबविण्यात यश आले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता युद्धविराम सुरू होणार होता. (Israel Hamas Ceasefire)
नेतन्याहू यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण
युद्धविराम सुरू होण्याच्या अवघ्या 12 तास आधी राष्ट्राला संबोधित करताना, नेतान्याहू यांनी दावा केला की त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष-निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन आहे, ज्यांच्याशी ते बुधवारी बोलले होते. नेतन्याहू यांनी हमासने युद्धविरामास सहमती देताना लेबनॉन आणि सीरियामध्ये इस्रायलच्या लष्करी यशाचाही उल्लेख केला. आम्ही मध्य पूर्वेचा चेहरा बदलला आहे, असं नेतान्याहू म्हणाले. पण जोपर्यंत हमास ओलीसांची यादी देत नाही तोपर्यंत ही युद्धविराम प्रभावी ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. (Israel Hamas Ceasefire)
अल-जझीराच्या बातम्यांनुसार, हमास ज्या तीन महिलांना सोडत आहे, त्या इस्रायली सैनिक नाहीत आणि त्या बहुधा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा अल्पवयीन आहेत. हमासने सांगितले की, ते आज ओलिस ठेवलेल्या रोमी गोनेन, एमिली डमरी आणि डोरोन नावाच्या महिलांची सुटका करेल. इस्रायल सरकारने हमासची यादी मिळाल्याची पुष्टी केली आहे. यानंतर आता युद्धबंदी अधिकृतपणे लागू झाल्याचे समजू शकते.

करारात काय ठरले आहे?
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा पहिला टप्पा आजपासून सुरू होत आहे. हा टप्पा एकूण 42दिवसांचा असेल. या काळात हमासचे सैनिक 98 इस्रायली बंधकांपैकी 33 जणांची सुटका करतील. इस्रायलमधून 737 कैद्यांची सुटका होणार आहे. ओलीस आणि कैद्यांच्या अदलाबदलीसाठी तीन मुद्यांची तरतूद करण्यात आली आहे. हे पॉइंट केरीम शालोम, इरेझ आणि रीममध्ये असतील. येथे डॉक्टर आणि मानसिक आरोग्य तज्ञ उपस्थित राहणार आहेत जे सोडण्यात येणाऱ्या लोकांची तपासणी करतील. (Israel Hamas Ceasefire)
करारानुसार, या 42 दिवसांत इस्रायली सैन्य गाझामधील दाट लोकवस्तीच्या भागातून हळूहळू माघार घेण्यास सुरुवात करेल. या भागातून लष्कराने माघार घेतल्यानंतरच येथील रहिवासी पुन्हा आपल्या घरी परतू शकतील. सर्व इस्रायली ओलीसांची सुटका होईपर्यंत इस्रायली सैन्य गाझामधून पूर्णपणे माघार घेणार नाही. युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्याच्या १६व्या दिवसापासून दुसऱ्या टप्प्यासाठी वाटाघाटी सुरू होतील.

इस्रायली सैन्याची तयारी
IDF ने ओलिसांना सोडण्यासाठी गाझा सीमेजवळ तीन छावण्या उभारल्या आहेत. हे शिबिरे रीम बेस, केरेम शालोम क्रॉसिंग आणि इरेझ क्रॉसिंग येथे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे ओलीस डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि मानसिक आरोग्य अधिकाऱ्यांसह IDF प्रतिनिधींना भेटतील आणि त्यांना प्राथमिक उपचार दिले जातील.
(Israel Hamas Ceasefire)